महापूरामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं आयुष्य उध्वस्त, मराठी कलाकार मदतीसाठी सरसावले; कोणी केली मदत?
Marathwada Flood : मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मराठी सिनेसृष्टीतील कलाकार पुढे आले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

महापूरामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा मोठा फटका बसलाय

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मराठी कलाकार सरसावले आहेत
Marathwada Flood : गेल्या 15 दिवसांपासून मराठवाड्यातील ढगफुटीसदृश्य पाऊस थांबायचं नाव घेत नाही. सतत सुरु असल्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. महापूराने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हेरावून घेतलाय. तर मराठवाड्यातील अनेक लोकांना महापूरामुळे जीव गमवावा लागलाय. शिवाय, अनेक जनावरं देखील मृत्यूमुखी पडली आहे. दरम्यान, संपूर्ण मराठवाडा महापूराच्या संकटात सापडला असताना आता मराठी कलाकार त्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. शेतकऱ्यांना कोण कोणत्या कलाकारांनी मदत करण्यास सुरुवात केलीये? जाणून घेऊयात...
मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कोण कोणत्या कलाकरांनी मदत केली?
मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रथम ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेते मकरंद अनासपूरे पुढे आले होते. त्यांनी नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून मदत करणार असल्याचं सांगितलं. त्यांनी नाम फाऊंडेशनच्या फेसबुकवर एक व्हिडीओ देखील शेअर केलाय. दरम्यान या दोघांशिवाय अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे हे देखील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.
नाना पाटेकर म्हणाले, तीस जिल्हे महापूरामुळे बाधित आहेत. मराठवाडा आणि सोलापूर जास्त करुन आहे. हानी भरुन न येण्यासारखी आहे. सरकार त्यांच्या पद्धतीने काम करत आहे. आपण आपल्या परीने काय करता येईल ते पाहूयात. आम्ही नाम फाऊंडेशनच्या वतीने मदत करत आहोत.
मकरंद अनासपुरे म्हणाले, कोणीही खचून जाऊ नये. यातून अविचार करु नये, असं आवाहन आम्ही नाम फाऊंडेशनच्या वतीने करतो. आम्ही किराणा किटच्या माध्यमातून आम्ही मदत सुरु केली आहे.