आम्हाला खाज होती म्हणून माळेगाव कारखान्याचा चेअरमन झालो, अजित पवारांचं वक्तव्य; कोणाला दिला इशारा?
Ajit Pawar on Malegaon sugar factory : आता सोमेश्वर साखर कारखान्याचाही चेअरमन होणार, अजित पवारांचं वक्तव्य
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

आम्हाला खाज होती म्हणून माळेगाव कारखान्याचा चेअरमन झालो

आता सोमेश्वर कारखान्याचाही चेअरमन होणार, अजित पवारांचं वक्तव्य
Ajit Pawar, Baramati : "आम्हाला फार खाज होती, म्हणून मी माळेगाव कारखान्याचा चेअरमन झालो. तिथं मी सभासद देखील झालोय. आता पुढच्या वेळेस सोमेश्वरकडे पण येणार आहे. तिकडेही चेअरमन होणार आहे. रेकॉर्डच मोडतो. सगळ्या कारखान्यांचा अजित पवार चेअरमन.. मी गमतीने बोलतोय. नाहीतर ज्याला चेअरमन व्हायचंय, त्याला झोप यायची नाही. काही लोकं म्हणायची, याला या वयात काय सुचत आहे? आम्ही कुठं जायचं", असं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. बारामती (Baramati) तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या आवारात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात अजित पवार (Ajit Pawar) बोलत होते. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यामुळे समोरील शेतकऱ्यांना हशा पिकलेला पाहायला मिळाला.
चेअरमन पदासाठी बाशिंग लावून बसलेले अनेक जण आहेत - अजित पवार
या वेळी बोलताना अजित पवारांनी माळेगाव व सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यांचा उल्लेख केला. सर्वाधिक भाव देणारा सोमेश्वर कारखाना असं बोलत असतानाच अजित पवार मध्येच म्हणाले, आम्हाला खाज होती म्हणून माळेगावचा चेअरमन झालो.. पण तिथे आता सभासद देखील झालो आहे...थोडे दिवस थांबा सोमेश्वरला देखील मी सभासद होणार आहे. एक तर अगोदरच चेअरमन पदासाठी बाशिंग लावून बसलेले अनेक जण आहेत. त्यांना असं वाटतं की कधी माझं नाव लग्नपत्रिकेवर प्रेक्षक म्हणून चेअरमन म्हणून प्रसिद्ध होईल. त्यामुळे मी सोमेश्वर सहकारी कारखान्याचा चेअरमन होणार नाही. काळजी करू नका.