अग्गंबाई सासूबाई मालिकेचं ‘हे’ असणार नवं नाव

मुंबई तक

• 11:20 AM • 24 Feb 2021

अग्गंबाई सासूबाई या मालिकेने लीप घेतला आहे. त्यामुळे आता अग्गंबाई सासूबाई नाही तर अग्गंबाई सूनबाई ही कथा पहायला मिळणार आहे. या नव्या गोष्टीमध्ये आता भित्र्या आसावरीचं नवं रूप पहायला मिळणार आहे. आसावरी आता एक स्ट्राँग बिझनेस वूमन झाली आहे. या नव्या कथेसह मालिकेचं शीर्षक देखील बदलण्यात आलंय. त्यामुळे आता अग्गंबाई सासूबाईऐवजी अग्गंबाई सूनबाई हे मालिकेचं […]

Mumbaitak
follow google news

अग्गंबाई सासूबाई या मालिकेने लीप घेतला आहे. त्यामुळे आता अग्गंबाई सासूबाई नाही तर अग्गंबाई सूनबाई ही कथा पहायला मिळणार आहे. या नव्या गोष्टीमध्ये आता भित्र्या आसावरीचं नवं रूप पहायला मिळणार आहे. आसावरी आता एक स्ट्राँग बिझनेस वूमन झाली आहे. या नव्या कथेसह मालिकेचं शीर्षक देखील बदलण्यात आलंय. त्यामुळे आता अग्गंबाई सासूबाईऐवजी अग्गंबाई सूनबाई हे मालिकेचं शीर्षक आहे.

हे वाचलं का?

झी मराठीवरील अग्गंबाई सासूबाई ही मालिका प्रचंड गाजली. बबड्या, शुभ्रा, आसावरी तसंच अभिजित राजे या सर्व व्यक्तीरेखा लोकांच्या पसंतीस उतरल्या. मात्र मालिकेच्या कथेत आणि काळात बदल करण्यात आला. याचशिवाय मालिकेच्या पात्रांमध्येही बदल झालेत. अग्गंबाई सूनबाई या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान दिसणार नसून शुभ्राची भूमिका उमा पेंढरकर साकारणार आहे.

तर आगामी अग्गंबाई सूनबाई या मालिकेचा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. काही काळानंतर कुलकर्णी घरात बरेच बदल दिसून येतायत. यात अभिजीत राजे आणि आसावरी दिसत आहेत. आसावरी एका मोठ्या कंपनीची मालकीण झाली आहे. पूर्ण आत्मविश्वासाने तिने आता ऑफिसचं कामकाज हातात घेतलं असून यशस्वरित्या पार पाडतेय. तिच्या सोबत सोहम आता राईट हँड म्हणून काम बघतोय. तर अभिजित राजेंनी त्यांच्या स्टाईलने स्वखुशीने घर सांभाळायला घेतलंय. तर नव्या शुभ्राने आईपण स्विकारून तिच्या मुलाची म्हणजे बबडूची जबाबदारी सांभाळत संसाराला सुरुवात केलीये.

दरम्यान अभिनेत्री उमा पेंढरकरने यापूर्वी स्वामिनी मालिकेमध्ये पार्वतीबाईंची भूमिका साकारली होती. तर आता ती ‘अग्गंबाई सूनबाई’ मालिकेमध्ये शुभ्राचं पात्र साकारताना दिसणार आहे. या नव्या कथेत सोहमची भूमिका आशुतोष पत्की साकारणार नसून ही भूमिका कोण करणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. तर तेजश्री प्रधान ऐवजी नवी शुभ्रा प्रेक्षकांची मनं जिंकून घेणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

    follow whatsapp