पेट्रोल आणि डिझेल यांनी सोन्या, चांदीची मस्ती उतरवली, सुबोध भावेने केंद्र सरकारवर साधला निशाणा

वाढत्या महागाईमुळे जनता त्रस्त झाली आहे. दिवसागणिक पेट्रोलचे गगनाला भिडणारे भाव प्रत्येकालाच अस्वस्थ करणारे आहेत. या वाढत्या महागाईवरून मराठमोळा अभिनेता सुबोध भावेने एक मार्मिक पोस्ट केली आहे. सध्या सुबोध भावेची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. सुबोधच्या या पोस्टने पोस्टने सर्वांचे लक्ष वेधलं आहे व ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आपल्या पोस्टमध्ये […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 09:43 AM • 11 Oct 2021

follow google news

वाढत्या महागाईमुळे जनता त्रस्त झाली आहे. दिवसागणिक पेट्रोलचे गगनाला भिडणारे भाव प्रत्येकालाच अस्वस्थ करणारे आहेत. या वाढत्या महागाईवरून मराठमोळा अभिनेता सुबोध भावेने एक मार्मिक पोस्ट केली आहे. सध्या सुबोध भावेची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. सुबोधच्या या पोस्टने पोस्टने सर्वांचे लक्ष वेधलं आहे व ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हे वाचलं का?

आपल्या पोस्टमध्ये सुबोध म्हणतो, ‘सतत असं वाटायचं की या सोनं आणि चांदी चा माज कोणीतरी उतरवला पाहिजे, त्यांना त्यांच्या किंमतीमुळे आपण लैच भारी असं वाटायला लागलं होतं.सतत असं वाटायचं की या सोनं आणि चांदी चा माज कोणीतरी उतरवला पाहिजे,त्यांना त्यांच्या किंमतीमुळे आपण लैच भारी असं वाटायला लागलं होतं.दरवर्षी सण आला की त्यांचा रुबाब वाढायचा.पण आता नाही …..कारण आता पेट्रोल आणि डिझेल यांनी सोन्या,चांदीची मस्ती उतरवली.आता दागिने पण यांचेच करणार,बँकेत ठेव म्हणून पण हेच ठेवणार.स्वतःबरोबर अख्खा बाजारभाव वाढवण्याच यांचं कर्तृत्व अफाट आहे .हे दोन नवीन भारीतले दागिने आम्हाला दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद

    follow whatsapp