सैराटची लोकप्रिय जोडी बाळ्या आणि सल्या झळकणार छोट्या पडद्यावर

मराठी चित्रपटाचा इतिहास सुवर्ण अक्षरात कोरणारा चित्रपट म्हणजे सैराट. या चित्रपटातील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. या चित्रपटात पारश्याची पुरेपूर साथ देणारे त्याचे दोन मित्र बाळ्या आणि सल्या यांच्या लक्षवेधी भूमिका प्रेक्षक अजूनही विसरले नाही आहेत. हीच जोडी आता छोट्या पडद्यावर झळकणार आहे. हो हे खरं आहे. बाळ्या आणि सल्याची जोडी झी मराठीवरील मन […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 12:24 PM • 18 Aug 2021

follow google news

मराठी चित्रपटाचा इतिहास सुवर्ण अक्षरात कोरणारा चित्रपट म्हणजे सैराट. या चित्रपटातील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. या चित्रपटात पारश्याची पुरेपूर साथ देणारे त्याचे दोन मित्र बाळ्या आणि सल्या यांच्या लक्षवेधी भूमिका प्रेक्षक अजूनही विसरले नाही आहेत. हीच जोडी आता छोट्या पडद्यावर झळकणार आहे. हो हे खरं आहे. बाळ्या आणि सल्याची जोडी झी मराठीवरील मन झालं बाजिंद या आगामी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यांच्या व्यक्तिरेखेबद्दलची माहिती अजून गुलदस्त्यात असली तरी पण हे दोघे छोट्या पडद्यावर देखील आपल्या तुफान अभिनय कौशल्याने प्रेक्षकांचं भरगोस मनोरंजन करणार यात शंकाच नाही.आजवर मालिकांमध्ये प्रेमाचा रंग गुलाबी असलेला आपण पाहिलाय. परंतु पहिल्यांदाच मन झालं बाजिंद या मालिकेत राया आणि कृष्णाच्या प्रेमकथेत पिवळ्या रंगाची उधळण आपल्याला पहायला मिळणार आहे. या मालिकेत कृष्णा आणि राया सोबत आता बाळ्या आणि साल्या देखील प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहेत. या मालिकेतून अभिनेता वैभव चव्हाण आणि अभिनेत्री श्वेता राजन हे दोघे पहिल्यांदाच मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांना भेटणार आहेत. या मालिकेचे दिग्दर्शन अनिकेत साने यांनी केलेले असून वाघोबा प्रॉडक्शन यांनी या मालिकेच्या निर्मीतीची धुरा सांभाळली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp