Salman Khan and Zeeshan Siddique Fresh Death Threats: सलमान खानसह मुंबईच्या 'या' आमदाराला जीवे मारण्याची पुन्हा धमकी, यामागे कुणाचा हात?

Salman Khan And zeeshan siddique Gets Fresh Death Threats: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत 15 आरोपींना अटक केली आहे. सिद्दीकींच्या हत्येनंतर संपूर्ण देशभरात खळबळ माजली होती.

सलमान खान

बॉलिवुड अभिनेता सलमान खान

मुंबई तक

29 Oct 2024 (अपडेटेड: 29 Oct 2024, 04:21 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

सलमान खानसह बड्या आमदाराला कुणी केला धमकीचा मेसेज?

point

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आतापर्यंत 15 आरोपींना अटक

point

मुंबई पोलिसांनी आरोपीच्या आवळल्या मुसक्या

Salman Khan And zeeshan siddique Gets Fresh Death Threats: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत 15 आरोपींना अटक केली आहे. सिद्दीकींच्या हत्येनंतर संपूर्ण देशभरात खळबळ माजली होती. या प्रकरणात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई गँगचा हात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे सलमान खानच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांनी त्याची सुरक्षा वाढवली आहे. या प्रकरणाची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू असतानाच सलमान खान आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी नोएडा येथून आरोपीला अटक केलीय. गुरफान खान असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.

हे वाचलं का?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी उकळण्याच्या उद्देशाने आरोपीने सलमान खान आणि झिशान सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. सिद्दीकी यांच्या फोनवर धमकीचा मसेज आला होता. त्यानंतर वांद्रे पूर्व निर्मल नगर पोलिसांनी सोमवारी खंडणीचा गन्हा दाखल केला. आरोपी गुरफानने सलमान खान आणि झिशान सिद्दीकी यांना 25 ऑक्टोबरला धमकीचा मेसेज केला होता. मुंबई पोलिसांनी कसून चौकशी करून आरोपी गुरफान खानच्या मुसक्या आवळल्या. 

हे ही वाचा >> BJP 4th Candidates List: भाजपची चौथी यादी जाहीर! अखेरच्या टप्प्यात किती उमेदवारांना संधी?

सिद्दीकी यांच्या कार्यलयातील कर्मचाऱ्यांनी फोनवर धमकीचा मेसेज आल्याचं झिशान सिद्दीकींना सांगितलं. त्यानंतर सिद्दीकी यांनी मुंबई पोलिसांना तातडीने संपर्क साधून या धक्कादायक प्रकाराची माहिती दिली. सिद्दीकी यांचा कर्मचारी रितेश मोरेनं याप्रकरणी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

हे ही वाचा >> Maharashtra Assembly Election 2024 LIVE : भाजपची चौथी यादी जाहीर, मीरा भाईंदरमध्ये कोणाला मिळाली संधी ?

आयपीसीच्या 308 (2), 308 (5) आणि 351 (1) अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला नोएडा येथून ताब्यात घेतलं.झिशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी यांची वांद्रे येथे 12 ऑक्टोबरला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा सहभाग असल्याचं समजते. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी गँगच्या 15 जणांना अटक केली आहे. 

    follow whatsapp