ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांचं निधन, ‘या’ राजकीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई तक

04 Jun 2023 (अपडेटेड: 04 Jun 2023, 04:29 PM)

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी अर्थात सुलोचना लाटकर (Sulochana Latkar) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे.सुलोचना दीदी यांच्या निधनाने आता चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. दरम्यान सुलोचना दीदी यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीसह राजकीय वर्तुळातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

sulochna latkar passed away political leaders sharad pawar devendra fadnavis paid tributes

sulochna latkar passed away political leaders sharad pawar devendra fadnavis paid tributes

follow google news

Sulochana Latkar Passed Away : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी अर्थात सुलोचना लाटकर (Sulochana Latkar) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे.त्या 94 वर्षांच्या होत्या. मुंबईतील शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचारु सूरू होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत माळवली होती. सुलोचना दीदी यांच्या निधनाने आता चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. दरम्यान सुलोचना दीदी यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीसह राजकीय वर्तुळातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. (sulochna latkar passed away political leaders sharad pawar devendra fadnavis paid tributes)

हे वाचलं का?

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सुलोचना दीदी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनय क्षेत्रातील असामान्य व्यक्तीमत्वाचा एक चेहरा हरपला आहे. मार्च महिन्यात सुलोचना दीदी ज्यावेळी आजारी पडल्या होत्या. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी सुलोचना दीदी यांच्या उपचाराचा खर्च उचलणार असल्याचे जाहिर केले होते.

हे ही वाचा : Sulochana Latkar : पडद्यावरील आई गेली! सुलोचना दीदी यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखदायक आहे. सुमारे सहा दशके सुलोचना दीदींनी आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. रुपेरी पडद्यावर त्यांनी साकारलेल्या सात्त्विक, सोज्वळ अशा वात्सल्यमूर्ती आईच्या भूमिका कोट्यवधी रसिकांच्या मनात घर करून आहेत. त्यांच्या निधनाने सकस आणि निरागस अभिव्यक्तीपासून चित्रपटसृष्टी पारखी झाली आहे. पद्मश्री स्व. सुलोचना लाटकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा आशयाचे ट्विट करत राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

तीनशेहून अधिक मराठी-हिंदी चित्रपटातून आपल्या अभिनयाने सिनेसृष्टी संपन्न करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री, पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण सुलोचना दीदी यांच्या निधनाने एका सदाबहार व्यक्तिमत्वाला आज महाराष्ट्र मुकला आहे. स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरच्याही काळात आघाडीच्या अभिनेत्री म्हणून त्यांनी मोठा कालखंड गाजवला आणि त्यानंतर सुद्धा सातत्याने विविध भूमिका त्यांनी साकार केल्या. जवळजवळ 50 हून अधिक वर्ष त्यांनी चित्रपटाचा पडदा गाजविला. व्यक्तिरेखा हुबेहूब जिवंत करणाऱ्या वात्सल्यमूर्ती आणि एका महान कलावंताला आज आपण सारे मुकलो आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,असे ट्विट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करत सुलोचना दीदींना श्रद्धांजली वाहिली आहे.

हे ही वाचा : Vaibhavi Upadhyaya Death : कार कोसळली दरीत! अभिनेत्रीचा भयंकर अपघातात मृत्यू

दरम्यान सुलोचना दीदी यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी उद्या सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत त्यांच्या 11, प्रभा मंदिर सीएचएस,प्रभा नगर, पी.बाळू मार्ग नगर, प्रभादेवी. मुंबई या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी साडेपाच वाजता शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे.

    follow whatsapp