सुशांत सिंग राजपूतच्या मॅनेजरला एनसीबीकडून अटक

मुंबई तक

• 07:54 AM • 02 Feb 2021

बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने अजून एक कारवाई करत एका व्यक्तीला ताब्यात घेतलंय. मंगळवारी एनसीबीने मोठी कारवाई करत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा मित्र आणि असिस्टंड डिरेक्टर ऋषिकेश पवारला चौकशीसाठी अटक करण्यात आली आहे. ऋषिकेश हा सुशांतच्या एका प्रोजेक्टवर मॅनेजर म्हणून काम करत होता. पोलिस गेल्या काही महिन्यांपासून ऋषिकेशचा शोध घेत होते. मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकेश गेल्या काही […]

Mumbaitak
follow google news

बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने अजून एक कारवाई करत एका व्यक्तीला ताब्यात घेतलंय. मंगळवारी एनसीबीने मोठी कारवाई करत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा मित्र आणि असिस्टंड डिरेक्टर ऋषिकेश पवारला चौकशीसाठी अटक करण्यात आली आहे. ऋषिकेश हा सुशांतच्या एका प्रोजेक्टवर मॅनेजर म्हणून काम करत होता.

हे वाचलं का?

पोलिस गेल्या काही महिन्यांपासून ऋषिकेशचा शोध घेत होते. मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकेश गेल्या काही दिवसांपासून फरार होता. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या घरी धाडही टाकली होती. यावेळी त्याच्या लॅपटॉपमध्ये जरूरीची माहिती मिळाली असून ऋषिकेशची हार्ड डिस्क एनसीबीकडून जप्त करण्यात आलीये.

अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे अनेक ड्रीम प्रोजेक्ट होते. त्यातील एका प्रोजेक्टवर ऋषिकेश काम करत असल्याची माहिती आहे. सुशांतचा नोकर दिपेश सावंत याच्या चौकशीत ऋषिकेश पवार याचं नाव समोर आलं होतं.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत 14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रेच्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. सुशांतच्या मृत्यूनंतर सीबीआय, ईडी, एनसीबी, मुंबई तसंच बिहार पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. यावेळी एनसीबीच्या चौकशीतून बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण समोर आलं होतं. यामध्ये सुशांतची जवळची मैत्रिण रिया चक्रवर्तीला एनसीबीकडून अटक करण्यात आली होती. शिवाय अभिनेत्री दिपीका पदुकोण, श्रद्धा कपूर अशा बड्या कलाकारांची चौकशी केली गेली. त्याचप्रमाणे 30 पेक्षा अधिक ड्रग्ज पेडलर्सला अटक केली गेली.

    follow whatsapp