विधवा आईने पोटच्या मुलींना मांत्रिकाच्या हवाली केले, त्याने शेतात नेऊन केला बलात्कार; मांत्रिक निघाला आईचा प्रियकर

Crime News : आई आणि मुलांचं नातं हे जगातील सगळ्यात पवित्र नातं मानलं जातं. मात्र या नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलेच्या प्रियकराने त्या महिलेच्या दोन्ही मुलींवर बलात्कार केला आहे. धक्कादायक म्हणजे, या महिलेने उपचाराच्या बहाण्याने दोन आपल्या मुलींना प्रियकराच्या हवाली केले. याप्रकरणी महिला आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 12:37 PM • 22 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

विधवा आईने पोटच्या मुलींना मांत्रिकाच्या हवाली केले

point

त्याने शेतात नेऊन केला बलात्कार

point

मांत्रिक निघाला आईचा प्रियकर

Crime News : आई आणि मुलांचं नातं हे जगातील सगळ्यात पवित्र नातं मानलं जातं. मात्र या नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलेच्या प्रियकराने त्या महिलेच्या दोन्ही मुलींवर बलात्कार केला आहे. धक्कादायक म्हणजे, या महिलेने उपचाराच्या बहाण्याने दोन आपल्या मुलींना प्रियकराच्या हवाली केले. याप्रकरणी महिला आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : जालना : चॉकलेटचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलांवर अत्याचार, 28 वर्षीय नराधम ताब्यात

जीवाच्या भीतीने प्रियकराच्या स्वाधीन

उत्तर प्रदेशातील मुरादाबाद परिसरातील ही घटना आहे. याठिकाणी राहणाऱ्या एका विधवा महिलेचे गेल्या तीन वर्षांपासून महेंद्र नावाच्या एका मांत्रिकाशी प्रेमसंबंध होते. महिनाभरापूर्वी महेंद्र याने या महिलेच्या १३ आणि १० वर्षांच्या मुली आजारी असल्याचे सांगून त्यांच्यावर कोणीतरी करणी केली असल्याचे भासवले. 'जर यांच्यावर उपचार केले नाहीत, तर यांचा मृत्यू होईल,' अशी भीती त्याने आईला घातली. पोटच्या मुलींच्या जीवाच्या भीतीने आईने त्यांना मांत्रिकाच्या स्वाधीन केले.

शेतात नेऊन बलात्कार

आरोपी मांत्रिक महेंद्र याने उपचाराच्या बहाण्याने दोन्ही मुलींना आपल्या घरी बोलावून घेतले आणि त्यानंतर त्यांना शेतात नेऊन त्यांच्यावर अत्याचार केले. कोणाला काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी देऊन त्याने या चिमुरडींना गप्प केले होते. मात्र, तीन दिवसांपूर्वी एका मुलीची प्रकृती खालावल्याने तिच्या आजोबांनी विचारपूस केली. तेव्हा घाबरलेल्या दोन्ही बहिणींनी मांत्रिकाने केलेले कृत्य आणि आईने त्याला केलेली मदत याबद्दलचा सर्व माहिती सांगितली.

हे ही वाचा : सांगली : पोटच्या दोन लेकरांना 20 हजाराला विकले, पाच दिवसांच्या मुलीची विक्री करताना आई सापडली

आई आणि प्रियकर ताब्यात

याप्रकरणी मुलींच्या आजोबांनी तातडीने पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी सांगितले की, आजोबांच्या तक्रारीवरून मांत्रिक महेंद्र आणि पीडित मुलींच्या आईविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी पोलिसांनी या दोन्ही आरोपींना अटक करून त्यांची रवानगी तुरुंगात केली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
 

    follow whatsapp