जालना : चॉकलेटचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलांवर अत्याचार, 28 वर्षीय नराधम ताब्यात

मुंबई तक

Jalna Crime : जालन्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका 28 वर्षीय व्यक्तीने चॉकलेटचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केला आहे. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथे हा प्रकार घडला.  या प्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. निलेश निशिकांत कुलकर्णी (वय 28 वर्ष) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 

ADVERTISEMENT

Jalna Crime
Jalna Crime
social share
google news

Jalna Crime: जालन्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका 28 वर्षीय व्यक्तीने चॉकलेटचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केला आहे. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथे हा प्रकार घडला.  या प्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. निलेश निशिकांत कुलकर्णी (वय 28 वर्ष) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 

हे ही वाचा : पुणे रेल्वे स्थानकावर चार वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमानं विकृतीची परिसीमा ओलांडली

मुलांना कपडे काढायला सांगून अश्लील कृत्ये

18 जानेवारी 2026 रोजी, रविवार असल्याने पीडित 13 वर्षीय अल्पवयीन मुलगा गावात खेळत होता. त्यावेळी आरोपीने त्या मुलासह त्याच्या मित्रांना चॉकलेटचे आमिष दाखवून आपल्या राहत्या खोलीत बोलावून घेतले. खोलीत गेल्यानंतर आरोपीने दरवाजा बंद करून मुलांना कपडे काढण्यास सांगितले व स्वतःही अश्लील कृत्ये केल्याचा आरोप आहे.

जीवे मारण्याची धमकी

पीडित मुलगा व त्याच्या मित्रांसोबत गैरवर्तन करत, पीडितास जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. नकार दिल्यानंतर आरोपीने मुलाचा हात पकडून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला व त्या मुलाशी अश्लील वर्तन केले. तसेच आरोपीने त्या अल्पवयीन मुलास धमकावत त्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचं फिर्यादीत नमूद आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp