कंगनाला ट्विटरचा झटका; अकाऊंट होणार बॅन?

मुंबई तक

• 11:18 AM • 04 Feb 2021

ट्विटरच्या माध्यमातून टोले लगावणाऱ्य़ा अभिनेत्री कंगना राणौतला ट्विटरनेच मोठा झटका दिला आहे. कंगनाच्या ट्विटर अकाऊंटवर ट्विटरने कारवाई केली आहे. या कारवाई अंतर्गत कंगनाने केलेले काही ट्विट्स डिलीट करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आंदोलनाला समर्थन देणाऱ्यांवर कंगनाने निशाणा साधलाय. यावेळी समर्थन देणाऱ्याविरोधात ट्विट करताना वापरलेल्या भाषेमुळे कंगनाचे ट्विट्स डिलीट करण्यात आले आहेत. देशात सध्या […]

Mumbaitak
follow google news

ट्विटरच्या माध्यमातून टोले लगावणाऱ्य़ा अभिनेत्री कंगना राणौतला ट्विटरनेच मोठा झटका दिला आहे. कंगनाच्या ट्विटर अकाऊंटवर ट्विटरने कारवाई केली आहे. या कारवाई अंतर्गत कंगनाने केलेले काही ट्विट्स डिलीट करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आंदोलनाला समर्थन देणाऱ्यांवर कंगनाने निशाणा साधलाय. यावेळी समर्थन देणाऱ्याविरोधात ट्विट करताना वापरलेल्या भाषेमुळे कंगनाचे ट्विट्स डिलीट करण्यात आले आहेत.

हे वाचलं का?

देशात सध्या शेतकरी आंदोलन सुरू आहे. याच शेतकरी आंदोलनावर सोशल मिडीयावर अनेक प्रतिक्रिया उमटतायत. यामध्ये भारतीय क्रिकेटर रोहित शर्मानेही ट्विट करून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. रोहितच्या या ट्विटला रिप्लाय देत कंगनाने अपशब्द वापरले. कंगनाच्या या आक्षेपार्ह ट्विटची दखल घेत ट्विटरने तिच्या अकांऊंटवर कारवाई केलीये.

भारत हा एकजूटीने असून आपण सर्वजण समस्येवर मार्ग काढणं ही काळाची गरज आहे. आपल्या शेतकऱ्यांचा देशाच्या विकासात मोलाचा वाटा आहे. देशाच्या भल्यासाठी सर्वजण एकत्रित येऊन त्यांची जबाबदारी पार पाडतील, असं ट्विट रोहित शर्मा यानं केलं होते.

तर या ट्विटला रिप्लाय देत कंगनाने रोहितवर थेट निशाणा साधत तो खूप घाबरला असल्याचं म्हटलंय. “केंद्र सरकारचं क्रांतीकारक पाऊल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकरी कायद्याविरोधात शेतकरी का असतील? हे दहशतवादी आहेत जे गोंधळ घातलायत….असं म्हणा ना, इतके घाबरताय?, असंही कंगनाने तिच्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. मात्र काही वेळातचं ट्विटरने कंगनाची ही पोस्ट डिलीट केली.

सध्या सुरु असलेल्या वादात, कंगनाने जे टि्वट केले होते त्याठिकाणी आता “टि्वटरच्या नियमांचं उल्लंघन होत असल्यामुळे हे टि्वट आता उपलब्ध नाही असा मेसेज येतोय.” कंगनाने नियमांचा भंग केल्याचं कारण देत ही कारवाई करण्यात आलीये. “कंगनाने ज्या पद्धतीने भाषेचा वापर केला आहे. ती या प्लॅटफॉर्मसाठी योग्य नाही. आमच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या ट्विट्सवरच आम्ही कारवाई केली आहे,” असं ट्विटरच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय.

कंगनाने एकूण तीन ट्विट्स डिलीट करण्यात आले आहेत. दरम्यान अमेरिकेसंदर्भात तिने केलेलं ट्विट डिलीट कऱण्यात आलेलं नाही. तर आता कंगनाच्या अशा ट्विट्समुळे तिचं अकाऊंट बॅन केलं जाणार हा हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp