पनवेल महापालिका निवडणुकीत 2017 मध्ये भाजपने किती जागा जिंकल्या? शेकापची ताकद कशी होती? इतिहास घ्या जाणून

Panvel Muncipal Corporation history : पनवेल महानगरपालिका (PMC) ही रायगड जिल्ह्यातील पनवेल शहराचा कारभार सांभाळणारी संस्था आहे. 2016 मध्ये पालिकेचे रुपांतर हे महापालिकेत झालं, याची माहिती पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आला आहे.

panvel muncipal corporatin history

panvel muncipal corporatin history

मुंबई तक

• 05:02 PM • 25 Dec 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

पनवेल महानगरपालिका थोडक्यात इतिहास 

point

पनवेल महानगपालिका 2026 साठी निवडणूक कार्यक्रम 

Panvel Muncipal Corporation history : पनवेल महानगरपालिका (PMC) ही महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील पनवेल शहराचा कारभार सांभाळणारी संस्था आहे. पनवेल ही महाराष्ट्रातील पहिली नगरपालिका म्हणून ओळखली जाते, ज्याची स्थापना 25 ऑगस्ट 1852 मध्ये झाली. यानंतर, 1 ऑक्टोबर 2016 रोजी पनवेल महापालिकेत रुपांतर करण्यात आले होते. पनवेल शहर मुंबई-पुणे आणि मुंबई-गोवा महामार्गांच्या सुरुवातीचे ठिकाण आहे, आणि ते नवी मुंबईला लागून आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : लातुरच्या उदगीरमध्ये भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट, तीन दिवसांत 22 लोकांचे तोडले लचके

पनवेल महानगरपालिका थोडक्यात इतिहास 

पनवेल महापालिका ही राज्यातील 27 वी महापालिका आहे. या महापालिकेत पनवेल शहर, सिडको वसाहत आणि परिसरातील 68 महसुली गावांचा समावेश करण्यात आला. महापालिका अंतर्गत येणाऱ्या वसाहती आणि इतर गावांचे एकूण क्षेत्रफळ हे सुमारे 110 चौरस किमी आहे. या महापालिका निवडणुकीची पहिली निवडणूक ही 2017 मध्ये झाली होती.

पनवेल महापालिका निवडणुकीची तारीख आता समोर आली आहे. 15 जानेवारी 2026 रोजी होणार असून, मतमोजणी ही दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 16 जानेवारी रोजी होईल. या निवडणुकीसाठी 78 जागांवर निवडणूक लढवली जाणार आहे. तसेच उमेदावारी अर्ज देखील भरवण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

विमानतळ प्रकल्पामुळे पनवेलमधील विमानतळ प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. ज्यामुळे निवडणुकीचे गणित आता बदलू लागले आहे. 5 लाख 54 हजार 578 मतदार तर 2 लाख 94 हजार 821 पुरुष मतदारांचा समावेश आहे.

पनवेल महानगपालिका 2026 साठी निवडणूक कार्यक्रम 

नामनिर्देशन- 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर

नामनिर्देशन पत्राची छाननी- 31 डिसेंबर

उमेदवार मागे घेणे- 2 जानेवारी 2026 पर्यंत

अंतिम यादी आणि चिन्ह- 3 जानेवारी 2026

मतदान- 15 जानेवारी 2026 

मतमोजणी/निकाल-16 जानेवारी 2026

2016 चे पक्षीय बलाबल-78 नगरसेवक

भाजप - 51

शेकाप - 23 

काँग्रेस - 2

राष्ट्रवादी - 2

मतदार यादीत नाव कसे तपासायचे?

तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही, हे तपासण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

electoralsearch.eci.gov.in या वेबसाइटवर जा.

तुमचा EPIC नंबर (मतदार ओळखपत्र क्रमांक) टाकून शोध घ्या. किंवा तुमच्या वैयक्तिक तपशिलावरून (नाव, जन्मतारीख) शोध घ्या.

हे ही वाचा : महाराष्ट्रातील सर्व नगराध्यक्षांसाठी मोठी बातमी, सरकार महत्त्वाचा अध्यादेश काढणार, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

आगामी निवडणुकीसाठी महत्त्वाचे बदल

डिजिटल व्होटर कार्ड (e-EPIC): आता तुम्ही तुमचे डिजिटल मतदार ओळखपत्र मोबाइलमध्ये डाऊनलोड करू शकता, जे भौतिक कार्ड इतकेच वैध आहे.

आधार लिंक: मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करण्याचे आवाहन निवडणूक आयोगाकडून केले जात आहे, जेणेकरून बोगस मतदानाला आळा बसेल.

    follow whatsapp