VIDEO: …अन् पुण्यात बावऱ्या बैलापुढे थिरकली गौतमी पाटील!

मुंबई तक

28 Apr 2023 (अपडेटेड: 28 Apr 2023, 11:42 AM)

पुण्यातील मुळशीमध्ये चक्क एका बैलासमोर गौतमी पाटीलच्या डान्सचं आयोजन करण्यात आलं होतं. पाहा याचा खास Video.

Mumbaitak
follow google news

पुणे:पुणे तिथं काय उणे…’ या म्हणीचा प्रत्यय आता पुन्हा एकदा आला आहे. ते देखील प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) खास कार्यक्रमामुळे.. त्याचं झालं असं की, पुण्याच्या मुळशीत विवाहच्या हळदी कार्यक्रमानिमित्त नृत्यांगना गौतमी पाटीलच्या नृत्याचा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पण हा कार्यक्रम चक्क एका बैलाच्या समोर सादर करण्यात आला. कार्यक्रमाच्या वेळी बावऱ्या बैल गौतमीच्या स्टेजच्या समोर बांधला होता आणि त्यापुढे गौतमी नृत्य सादर करत होती. मुळशीतील सुशील राजाभाऊ हगवणे युवा मंच बावऱ्या फॅन्स क्लबने हा कार्यक्रम आयोजित केला होता. (video gautami patils dance program was organized in front of a bull in pune)

हे वाचलं का?

 

 

गौतमी पाटीलचा कार्यक्रम अन् महिलांनी हाती घेतल्या लाठ्या-काठ्या

गौतमी पाटील हिचा कार्यक्रम म्हटला की, तरुणाई तुडुंब गर्दी करतं. त्यामुळेच अनेकदा हुल्लडबाजी देखील होते. पण आपल्या गावात असा काही राडा होऊ नये यासाठी स्वत: गावातील महिला लाठ्या-काठ्या घेऊन हुल्लडबाजांचा बंदोबस्त करण्यासाठी आल्या.

हे ही वाचा>> Zoom मीटिंग अचानक सुरू झाला अश्लील Video,अन् मीटिंगमधल्या लोकांनी…

जुन्नर तालुक्यातील निमदरी गावाजवळच्या पिराचीवाडी येथील वेताळेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त काही दिवसांपूर्वी गौतमी पाटीलचा कार्यक्रम पार पडला होता. पण पहिल्यांदाच गौतमीचा कार्यक्रम शांततेत पार पडला.

त्याचं झालं असे की, गौतमीच्या कार्यक्रमात गोंधळ होऊ नये म्हणून येथील आदिवासी ठाकर समाजातल्या महिला भगिनींसह काही महिलांनी सुरक्षिततेची जबाबदारी हातात घेतली होती. या महिलांनी कार्यक्रमात धुडगुस आणि गोंधळ टाळण्यासाठी हातात काठ्या व दांडकी घेऊन चोख बंदोबस्त ठेवला होता.

हे ही वाचा>> नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमध्ये चारच ट्रस्टी का.. तेही आप्पासाहेबांच्याच घरातील?

याशिवाय गौतमी पाटीलचे वैयक्तिक काही सुरक्षारक्षक व खाजगी कंपनीचे सुमारे २५ बाऊन्सर सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले होते. याशिवाय जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस देखील बंदोबस्तासाठी तैनात होते.इतकंच नाही तर स्टेजच्या समोरच तरुणांची मोठी गर्दी होते म्हणून तेथे महिलांना बसविण्यात आले होते. त्यामुळे तिचा हा पहिलाचा कार्यक्रम कोणताही अनुचित प्रकार न घडता किंवा गोंधळ गडबड न होता शांततेत पार पडला होता.

    follow whatsapp