अक्षय कुमारच्या बच्चन पांडे सिनेमात ‘हा’ करणार व्हिलनचा रोल

बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. अक्षय कुमारच्या आगामी बच्चन पांडे या चित्रपटाचं शूटींग सध्या जैसलमेरमध्ये सुरु आहे. काही दिवसांपूर्वी अक्षयचा या सिनेमातील फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला होता. त्या सिनेमातील हा लूक सोशल मिडीयावर चांगला व्हायरलही झाला होता. तर त्यानंतर आता या सिनेमातील अजून एका कलाकाराचं नावं समोर […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 11:57 AM • 30 Jan 2021

follow google news

बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. अक्षय कुमारच्या आगामी बच्चन पांडे या चित्रपटाचं शूटींग सध्या जैसलमेरमध्ये सुरु आहे. काही दिवसांपूर्वी अक्षयचा या सिनेमातील फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला होता. त्या सिनेमातील हा लूक सोशल मिडीयावर चांगला व्हायरलही झाला होता. तर त्यानंतर आता या सिनेमातील अजून एका कलाकाराचं नावं समोर आलंय.

हे वाचलं का?

अभिनेता अभिमन्यू सिंह देखील या बच्चन पांडे या चित्रपटात झळकणार आहे. या सिनेमात अभिमन्यू व्हिलनच्या भूमिकेत दिसून येणार आहे. अभिमन्यूने यापूर्वी देखील अक्षय कुमार सोबत काम केलं आहे. वन्स अपॉन टाईम इन मुंबई दोबारा या चित्रपटात त्याने अक्षयसोबत काम केलंय. हिंदी चित्रपटांसोबत त्याने साऊथच्या चित्रपटांमध्येही काम केलंय.

बच्चन पांडे या सिनेमामध्ये अक्षय कुमारसोबत क्रिती सेनन, अर्शद वारसी तसंच जॅकलीन फर्नांडीस मुख्य भूमिकेत आहेत. त्यानंतर आता व्हिलन म्हणून अभिमन्यू दिसणार आहे. साजिद नाडियावाला यांनी या सिनेमाची निर्मिती केली असून याचं दिग्दर्शन फरहाद मसाजी करणार आहेत. 2022 जानेवारीमध्ये हा चित्रपट येणार आहे.

2021 मध्ये अक्षय कुमारचे बरेच चित्रपट रिलीज होणार आहेत. यात सुर्यवंशीपासून राम सेतू, रक्षा बंधन, बेलबॉटम, पृथ्वीराज चौहान, अतरंगी रे तसंच बच्चन पांडे या चित्रपटांचा समावेश आहे. दरम्यान अक्षय कुमारने 2022 साली प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांसाठी मानधन वाढवल्याची देखील माहिती आहे.

    follow whatsapp