Republic Day Wishesh : 26 जानेवारी 2025 ला देशात 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. संपूर्ण भारतात प्रजासत्ताक दिन मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. दिल्लीच्या कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन केलं जातं. देशाप्रती असलेलं प्रेम आणि मान-सन्मानाची भावना तुमच्या जवळच्या व्यक्तींना, मित्रांना आणि नातेवाईकांना व्यक्त करण्यासाठी फेसबुक, व्हाट्सअॅप किंवा अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठी संदेश पाठवू शकता. या मेसेजच्या माध्यमातून तुम्ही प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊ शकता.
ADVERTISEMENT
सर्वांना द्या 26 जानेवारी 2025 प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
बलसागर भार होवो,
विश्वात शोभूनी राहो,
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
देशभक्तांच्या बलिदानामुळे स्वतंत्र झालो आम्ही,
कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो भारतीय आहोत आम्ही
रंग, रुप, वेश, भाषा जरी अनेक आहेत, तरी सारे भारतीय एक आहोत...
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
तीन रंग प्रतिभेचे, नारंगी, पांढरा अन् हिरवा,
रंगले न जाणो किती रक्ताने, तरी फडकतो नव्या उत्साहाने..
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
हे ही वाचा >> 26/11 हल्ल्यातील आजवरची सर्वात मोठी बातमी, कसाबनंतर आणखी एक आरोपी आता...
सर्वांनी जपा एकमेकांचं सुख,
तेव्हाच सुंदर होईल आपला देश...
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
एक देश, एक स्वप्न, एक ओळख, आम्ही भारतीय...!
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
माझी मायभूमी, तुला शतशत प्रणाम..
तू अखंड राहो हीच देवाचरणी प्रार्थना..
भारत माता की जय..प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
हे ही वाचा >> 'CM फडणवीसांच्या मनात मराठ्यांविषयी राग, द्वेष असेल तर...', उपोषण सुरू होताच जरांगे काय म्हणाले?
जय जवान, जय किसान, जय विज्ञान,
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
स्वतासाठी स्वप्न सगळेच बघतात..देशासाठी आपण आज एक स्वप्न बघुया..
चला आपण आपला भारत सुरक्षित आणि विकसित बनवुया..प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
तिरंगा उंच उंच उडू द्या..आपल्या हृदयातील अभिमान आणि एकतेने..
आपण आपल्या राष्ट्राला एक चांगला भाग बनवूया, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
ADVERTISEMENT
