'CM फडणवीसांच्या मनात मराठ्यांविषयी राग, द्वेष असेल तर...', उपोषण सुरू होताच जरांगे काय म्हणाले?
Manoj Jarange: आता आम्हाला कळेल मराठ्यांविषयी तुमच्या मनात द्वेष, आकस, राग आहे की नाही.. असं विधान मनोज जरांगे यांनी केलं आहे. त्यांनी आजपासून (25 जानेवारी) पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सुरू केलं उपोषण

मराठा आंदोलनासाठी मनोज जरांगेंची कंबर कसली

पाहा देवेंद्र फडणवीसांबाबत नेमकं काय म्हणाले
अंतरवाली सराटी: मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे यांनी आजपासून (25 जानेवारी) पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच चुचकारलं आहे.
'मुख्यमंत्री फडणवीसांच्या मनात जर आकस, द्वेष, राग असेल, त्यांना मराठ्यांचे पोरं मारून टाकावे वाटत असतील तर नाही देणार आरक्षण ते.' असं म्हणत जरांगेंनी एक प्रकारे मुख्यमंत्री फडणवीसांनाच पुन्हा एकदा घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
जरांगेंनी उपोषण सुरू करताच CM फडणवीसांना घेरलं, पाहा नेमकं काय म्हणाले..
'आजपासून आमरण उपोषण सुरू केलं आहे. उद्या 26 जानेवारीला 1 वर्ष पूर्ण होत आहे अधिसूचना काढली होती याला. एक वर्ष लागतंय सरकारला गोरगरीब मराठ्यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी. असं या राज्यात कधी घडलं नसेल असं या समाजासोबत घडतंय. एक वर्ष झालं समाज रस्त्यावर झुंजतोय. स्वत:च्या लेकारचं स्वप्न घेऊन वर्षभर करोडोंच्या संख्येने झुंजतोय.'
हे ही वाचा>> Manoj Jarange : 'मुख्यमंत्री साहेब..यांचा माज उतरवायला आम्हाला...', वाल्मिक कराड समर्थकांना मनोज जरांगेंचा इशारा
'आज आम्ही पुन्हा एकदा.. ज्या जुन्या मागण्या आहेत त्याच नव्याने मागण्या सरकारकडे करत आहोत. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्रच द्या. असा कायदा, जीआर किंवा अध्यादेश काढून या राज्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्राचं तात्काळ वाटप करण्यात यावं.'