सासरी जाताना नवऱ्याला रस्त्यातच कारमधून बाहेर काढलं अन् नवरी जंगलात पळाली, अख्ख्या गावातील लोक शोधायला गेले अन्..

Groom And Bride Shocking News : उत्तरप्रदेशच्या मुरादाबाद जिल्ह्यात मुडापांडे पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या दिल्ली-लखनऊ राष्ट्रीय महामार्गावर एका नवविवाहित महिलेनं हाय वोल्टेज ड्रामा केला.

वधू आणि वराची ai प्रतिमा

Groom And Bride Shocking News

मुंबई तक

07 Sep 2025 (अपडेटेड: 07 Sep 2025, 10:33 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

लग्न सोहळा संपल्यावर नवरीनं केला हाय व्होल्टेज ड्रामा

point

कारमधून नवरी पळाली अन् जंगलात गेली

point

त्या गावात नेमकं काय घडलं?

Groom And Bride Shocking News : उत्तरप्रदेशच्या मुरादाबाद जिल्ह्यात मुडापांडे पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या दिल्ली-लखनऊ राष्ट्रीय महामार्गावर एका नवविवाहित महिलेनं हाय वोल्टेज ड्रामा केला. मिळालेल्या माहितीनुसार, लग्न सोहळ संपन्न झाल्यानंतर सासरी जाताना या नवरीनं तिच्या पतीला कारमधून खाली उतरवलं आणि जंगलात पळून गेली. पाहुण्यांनी अथक प्रयत्न करून नवरीला शोधलं आणि कारमध्ये पुन्हा बसवलं. पण जेव्हा तिला पतीसोबत घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करण्यात आला, तेव्हा तिने हायवेवर धिंगाणा घातला आणि घरी जाण्यास नकार दिला.

हे वाचलं का?

या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि दोन्ही कुटुंबियांची चौकशी केली. चौकशीदरम्यान, नवविवाहित महिलेनं पतीसोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला आणि तिच्या कुटुंबियांसोबतच राहण्याची इच्छा व्यक्त केली. खूप वेळ सुरु राहिलेल्या या हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर पोलिसांनी दोन्ही कुटुंबियांना समजावलं आणि नवविवाहित महिला तिच्या कुटुंबियांसोबत निघून गेली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर परिस्थिती तणावाच्या बाहेर आली. 

हे ही वाचा >> पैसा-पाणी: तुम्हाला GST कपातीचा खरंच फायदा मिळेल का?

कारमधून पळाली नवरी

बिजोलिया भानूने माहिती दिली की, तिचं आता कोर्ट मॅरेज झालं आहे. रुद्रपूरमध्ये झालेल्या या लग्नानंतर नवविवाहिता बिलासपूरला उतरली आणि तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला. वॉशरूम जाण्याच्या बहाण्याने नवविवाहिता जंगलात पळाली. परंतु, लोकांनी शोधाशोध केली आणि तिला पकडलं. याप्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली, त्यानंतर पोलिसांनी दोन्ही कुटुंबियांना समजावलं.  

हायवेवर केला हाय व्होल्टेज ड्रामा

जिल्हा मुंडा पांडे परिसरात झालेल्या या घटनेबाबत पोलिसांना कळवण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही कुटुंबियांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं. चौकशीदरम्यान, नवरीनं नवऱ्यासोबत जाण्यास नकार दिला आणि तिच्या मर्जीने ती कुटुंबियांसोबत गेली. मुरादाबाद पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाबाबत दोन्ही कुटुंबियांना पोलीस स्टेशनमध्ये नेलं आणि त्यांच्यासोबत चर्चा केली आणि परिस्थिती सावरली. 

हे ही वाचा >>पुणे: श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप! भंडाऱ्याची उधळण अन् पुष्पवृष्टी...

    follow whatsapp