26/11 हल्ल्यातील आजवरची सर्वात मोठी बातमी, कसाबनंतर आणखी एक आरोपी आता...
26/11 Terrorist Attack: 26/11 मुंबई हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने प्रत्यार्पणाला मान्यता दिली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी नवी माहिती समोर येण्याची शक्यता
आरोपी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेची मान्यता
तहव्वूर राणानेच हल्लाच्या ठिकाणांची केलेली रेकी
26/11 Attack: मुंबई: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मुंबई हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणा (Tahawwur Rana) याचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मान्यता दिली आहे. या प्रकरणात त्याच्या शिक्षेविरुद्धची पुनर्विचार याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन उद्योगपती तहव्वूर राणा याच्यावर 2008 मध्ये मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप आहे. (way is cleared to bring mumbai terror attack convict tahawwur rana to india usa supreme court approves extradition)
2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी तहव्वूर राणा हवा असल्याने भारत त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी करत होता. अखेर आता त्या मागणीला यश आलं आहे. त्यामुळे आता 26/11 हल्ल्याबाबत काही नवी माहिती देखील समोर येण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा>> Mumbai 26/11 Attack: 10 अतिरेक्यांनी मुंबईला 60 तास धरलं वेठीस… 15 वर्षापूर्वी कसा झाला होता हल्ला?
13 नोव्हेंबर रोजी तहव्वूर राणाने या प्रकरणाच्या पुनरावलोकनासाठी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला. तहव्वूर राणा सध्या लॉस एंजेलिसमधील मेट्रोपॉलिटन डिटेन्शन सेंटरमध्ये कोठडीत आहे.
कोण आहे तहव्वूर राणा?
26/11 च्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात मुंबई पोलिसांनी तहव्वूर राणा याचे नाव आरोपपत्रात समाविष्ट केले होते. त्याच्यावर पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (ISI) आणि दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा यांचा सक्रिय सदस्य म्हणून काम केल्याचा आरोप आहे. आरोपपत्रात राणावर 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड कोलमन हेडलीला मदत केल्याचा आरोप होता. तहव्वुर राणा यानीच मुंबईत हल्ले होणार असलेल्या ठिकाणांची रेकी केली होती आणि ब्लूप्रिंट तयार करून ते पाकिस्तानी दहशतवाद्यांना दिलं होतं.










