Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रूपये जमा होत आहेत. ज्या महिलांच्या खात्यात सरकारकडून दर महिन्याला योजनेचा हप्ता जमा होत आहे. त्या महिलांच्या खात्यात सरकारने ऑक्टोबरमध्ये 3000 रूपये जमा केले होते. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सरकारने जमा केला होता. लाडक्या बहिणींना भाऊबीज म्हणून सरकारने हे पैसे दिले. पण यासाठी कोणत्या महिला पात्र ठरल्या आहेत हे जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
खरं तर सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात 10 ऑक्टोबरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले होते. त्यानुसार अनेक महिलांच्या खात्यात 3000 रूपये आणि 7500 रूपये जमा झाले होते. यामध्ये ज्या महिलांना सप्टेंबरचा हप्ता आधीच मिळाला होता त्यांच्या खात्यात ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे असे एकत्रित मिळून 3000 रूपये जमा झाले होते. तर ज्या महिलांच्या खात्यात तीन हप्त्यापर्यंत एकही रूपया जमा झाला नव्हता. त्या महिलांच्या खात्यात चौथ्या हप्त्यात एकत्रितपणे 7500 रूपये जमा झाले होते.
हे ही वाचा : Dussehra 2024 Stock Picks : दसऱ्याला खरेदी करा 'हे' 8 स्टॉक्स, मिळेल छप्परफाड रिटर्न
कोणत्या खात्यात येणार पैसे?
1) महिलेचं नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी सूचीत असलं पाहिजे.
2) त्यांचा आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असलेलं पाहिजे.
3) ही योजना सर्व नियम आणि अटींचं पालन करत आहे.
ज्या महिला या अटीत बसतात त्याच महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होणार असल्याची चर्चा आहे. आता जर तुम्ही या अटीत बसत असाल तर तुमच्या खात्यात देखील पैसे जमा होणार आहेत.
ADVERTISEMENT
