Pune Crime : पुण्यातील कोंढवा येथील एका प्रतिष्ठीत सोसायटीत भाडेतत्वावर राहणाऱ्या तरुणीने एका डिलिव्हरी बॉयवर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. आता याच प्रकरणाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पोलीस तपासातून समोर आलं की, महिलेनं लैंगिक अत्याचाराची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या प्रकरणात तक्रार करणाऱ्या तरुणीच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित प्रकरणात पोलिसांनी मंगळवारी याबद्दल माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : पत्नीचा जडला मेहुण्यावर जीव, प्रियकराच्या मदतीने पतीला दिला विजेचा झटका, खरं कारण लपवण्यासाठी रचला कट
संपूर्ण प्रकरण काय?
पुण्यातील एका 22 वर्षीय आयटी कर्मचारी असलेल्या तरुणीने 3 जुलै रोजी तिच्यासोबत घडलेल्या प्रकरणाबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. तिचा आरोप होता की, 2 जुलै रोजी एका डिलिव्हरी बॉयने जबरदस्तीने तिच्या फ्लॅटमध्ये प्रवेश केला आणि स्प्रेच्या मदतीने तिला बेशुद्ध केलं होतं. त्यानंतर, तरुणाने तिच्यावर लैंगिक अत्याचार करत महिलेसोबत सेल्फी काढला. जर याबाबत कोणाला काही सांगितल्यास तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले जातील, अशी धमकी देखील दिली.
या संपूर्ण घटनेत मोठा ट्विस्ट निर्माण झालेला दिसून आला आहे. संबंधित प्रकरणातून असं उघडकीस आलं की, या प्रकरणातील आरोपी हा डिलिव्हरी बॉय तक्रार करणाऱ्या महिलेचा मित्रच असल्याची माहिती समोर आली. तो महिलेच्या संमतीनेच फ्लॅटमध्ये आला होता. तपासादरम्यान, पोलिसांनी फ्लॅटमध्ये जबरदस्तीने प्रवेश करण्याची आणि स्प्रे वापरण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. पोलिसांनी लैंगिक अत्याचाराची तक्रार खोटी असल्याचं स्पष्ट झालं.
घडलेल्या घटनेनुसार, फोनवरील चॅट, मोबाईलवरील संभाषण आणि तरुणीनं केलेलं वर्तन अशा अनेक पुराव्यांच्या आधारे स्पष्ट झालं की, हा लैंगिक शोषणाचा गुन्हा नसून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. यामुळे आता तरुणीवर पोलिसांनीच कारवाई केली आहे.
हेही वाचा : घोर कलियुग! पती मुंबईत पैसे कमवायला गेला, 40 वर्षीय महिला लेकरांना सोडून तरुणासोबत...पतीला कळताच....
तरुणीवर गुन्हा दाखल
पोलिसांनी संबंधित प्रकरणात माहिती दिली की, सोमवारी लैंगिक शोषणाची खोटी तक्रार दाखल करणाऱ्या महिलेंविरोधात बीएनएसच्या कलम 212, 217 आणि 228 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सांगितलं की, खोटी माहिती आणि पुरावे दिल्याबद्दल आणि पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आम्ही तरुणीवरच गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT
