Mukhymantri Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा चौथा हप्ता हा महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. या चौथ्या हप्त्यात महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे एकत्रित मिळून 3000 जमा झाले आहेत. पण अनेक महिलांना अद्याप हे पैसे मिळाले नसल्याचं बोललं जात आहे. जर आपण या योजनेसाठी पात्र ठरला असाल तर तुम्हाला याचे पैसे नक्की मिळतील पण काही गोष्टींची पूर्तता करणं गरजेचं आहे.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात 10 ऑक्टोबरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार होते. त्यानुसार अनेक महिलांच्या खात्यात 3000 रूपये आणि 7500 रूपये जमा झाले. यामध्ये ज्या महिलांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता आधीच मिळाला होता त्यांच्या खात्यात ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे असे एकत्रित मिळून 3000 रूपये जमा झाले आहेत. तर ज्या महिलांच्या खात्यात तीन हप्त्यापर्यंत एकही रूपया जमा झाला नव्हता. त्या महिलांच्या खात्यात चौथ्या हप्त्यात एकत्रितपणे 7500 रूपये जमा झाले.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : महिलांनो, उरली शेवटची संधी!...तर एकही रूपया खात्यात येणार नाही?
पण या व्यतिरिक्त काही महिलांना पैसे आलं नसल्याचं समोर आलं आहे. तर सर्वात आधी अशा महिलांनी आपला अर्ज पात्र ठरला आहे की नाही हे तपासावं. कारण जोवर तुमचा अर्ज वैध ठरत नाही तोवर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. तसंच जर तुमचा अर्ज पात्र ठरला असला आणि तरीही तुमच्या खात्यात पैसे आले नाही तर काही गोष्टी तुम्हाला नक्कीच तपासून घ्याव्या लागतील.
यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं बँक खातं हे आधारकार्डशी लिंक असणं गरजेचं आहे. तसेच तुमच्या बँक खात्यामध्ये DBT अॅक्टिव्ह असणंही गरजेचं आहे.
कोणाच्या खात्यात पैसे येणार?
1) महिलेचं नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी सूचीत असलं पाहिजे.
2) त्यांचा आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असलेलं पाहिजे.
3) ही योजना सर्व नियम आणि अटींचं पालन करत आहे.
ज्या महिला या अटीत बसतात त्याच महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील. आता जर तुम्ही या अटीत बसत असाल तर तुमच्या खात्यात देखील पैसे जमा होणार आहेत. हे पैसे कसे तपासायचे, हे देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेची संपली मुदत? महिलांनो, आता कसे मिळणार पैसे ?
तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील लाभार्थी यादी तपासू शकता. या यादीत तुमचे नाव असेल तर तुम्हाला पैसे मिळतील यासोबत योजनेचे पैसै खात्यात आल्यानंतर तुम्हाला फोनवर मेसेज देखील येतो. जर मेसेल आला नसेल तर बँकेत जाऊन तुम्ही तुमचे पासबूकही तपासू शकता. अशाप्रकारे तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती मिळणार आहे.
ADVERTISEMENT
