Weight Loss Tips : पोटाचा घेर आणि मांड्यांची चरबी झरझर वितळेल! फक्त 'हे' 5 सुपरफूड्स खायला विसरू नका

Weight Loss Tips In Marathi : लठ्ठपणा दिवसेंदिवस एक मोठी समस्या बनत असल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे अनेक गंभीर आजार उद्धवू शकतात. लठ्ठपणा एक अशई समस्या आहे, ज्यामुळे अनेक आजार तोंड वर करू लागतात.

Weight Loss Tips In Marathi

Weight Loss Tips In Marathi

मुंबई तक

• 04:13 PM • 05 Mar 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

वजन कमी करण्यासाठी सकस आहार कोणता?

point

या पदार्थांचं सेवन केल्याने वजन होतं झटपट कमी

point

वजन कमी करण्यासाठी नेमकं काय करावं?

Weight Loss Tips In Marathi : लठ्ठपणा दिवसेंदिवस एक मोठी समस्या बनत असल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे अनेक गंभीर आजार उद्धवू शकतात. लठ्ठपणा एक अशई समस्या आहे, ज्यामुळे अनेक आजार तोंड वर करू लागतात. लठ्ठपणामुळे शरीराचा आकारच बिघडत नाही, तर अनेक प्रकारच्या क्रोनिक आजारांनाही वाढवतं. लठ्ठपणामुळे डायबिटीज, कोलेस्ट्रॉल, हाय ब्लड प्रेशर, थायरॉईड आणि हृदयाच्या रोगाचा धोका वाढतो. अशातच वजन नियंत्रणात ठेवणं खूप आवश्यक आहे. यासाठी फक्त व्यायाम नाही, सकस आहार घेणंही आवश्यक आहे. काही खास सूपरफूड्स असतात, ज्यामुळे मेटाबॉलिजम बूस्ट होत आणि फॅट बर्निंगच्या प्रोसेसला मदत मिळते.

हे वाचलं का?

सीनियर जनरल फिजिशयन डॉ. सुमित कांत झा यांनी वजन कमी करण्यासाठी 5 सुपरफूड्सबद्दल माहिती सांगितली आहे.डॉ. सुमित कांत झा यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रोटिन्स, फायबर आणि व्हिटॅमीन्स असलेले पदार्थ आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. हे वजन कमी करण्यासोबतच हेल्दी लाइफस्टाइल ठेवण्यासाठीही खूप उपयुक्त ठरतात. या पदार्थांचं सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. तसच अनेक आजारांच्या समस्यांपासूनही सुटका होते. 

दालचीनी

वजन कमी करण्यासाठी दालचीनी खूप फायदेशीर आहे. याला फॅट बर्नर म्हणूनही ओळखलं जातं. याच्या सेवनामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहते. यामुळे क्रेविंग्स कमी होते. दालचीनी ग्लुकोजला वेगाने पेशींमध्ये नेण्यास मदत करते. यामुळे मेटाबॉलिझम वेगाने निर्माण होतो आणि शरीरात फॅट स्टोरेज कमी होतो. 

हळद

फॅट कमी करण्यासाठी हळद खूप उपयुक्त आहे. यामध्ये करक्यूमिन नावाचं तत्व फॅट सेल्सला कमी करतं. हळदीचं सेवन केल्याने मेटाबॉलिजम बूस्ट होतं. यामुळे फॅट बर्न होण्यास मदत मिळते. हळदीत अँटी इंफ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुण असतात. यामुळे अनेक आजारांवर मात केली जाऊ शकते. 

हे ही वाचा >> Abu Azmi Suspended : औरंगजेबाचं कौतुक, आयशा टाकियाचे सासरे निलंबित, कोण आहेत अबू आझमी?

टॉमेटो

टॉमेटोमध्ये लो कॅलरी आणि मोठ्या प्रमाणात फायबर असतं. टॉमेटोचं सेवन केल्याने वजन कमी करण्यास मदत मिळते. टोमॅटोत असलेलं अमिनो एसिड वजन कमी करण्यास मदत करतं. टोमॅटोच्या नियमित सेवनामुळे शरीर हायड्रेटेड राहतं.

केळी

वजन कमी करण्यासाठी केळी खूप फायदेशीर आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतं. केळ्याच्या सेवनामुळे वजन तर कमी होतंच पण अनेक आजारांवरही हे रामबाण उपाय आहे. केळ्यात व्हिटॅमीन के आणि अँटीऑक्सीडंट्स मोठ्या प्रमाणात असतं. यामुळे फॅट बर्न होतं. 

हे ही वाचा >> Santosh Deshmukh Case : आरोपी फक्त 8 नाही, मुंडेंचा राजीनामा म्हणजे शेवट नाही? घडामोडींचा अर्थ काय?

चिया सीड्स 

वजन कमी करण्यासाठी चिया सीड्स खूप फायदेशीर असतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आणि प्रोटिन असतं. यामुळे मेटाबॉलिज वेगवान होतं. याशिवाय यामध्ये ओमेगा -3 फॅटी अॅसिड सुद्धा असतं. यामुळे बेली फॅट कमी होतं. 

    follow whatsapp