Mahayuti : भाजप 32 जागा, पवारांना 3, तर शिंदेंना फक्त...; शाहांनी काय सांगितलं?

ऋत्विक भालेकर

06 Mar 2024 (अपडेटेड: 06 Mar 2024, 11:19 AM)

Mahayuti lok sabha seats allocation : अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात महायुतीचे जागावाटप निश्चित झाले असून, औपचारिकताच राहिली आहे.

महायुतीमध्ये भाजप सर्वाधिक जागा लढणार असून, सर्वात कमी जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार आहेत.

भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीमध्ये शिवसेनेला मोठा त्याग करावा लागणार आहे.

follow google news

Maharashtra Mahayuti lok sabha seats allocation : भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना महायुतीच्या जागावाटप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यात निश्चित झाले आहे. शाह यांच्या उपस्थितीत मंगळवारी (5 मार्च) मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या महायुतीच्या बैठकीत जागावाटपावर चर्चा झाली. भाजप सर्वाधिक 32 जागांवर लढवणार आहे. तर अजित पवारांना 4 जागा दिल्या जाणार आहे. बैठकीत नेमकं काय घडलं याबद्दल विश्वसनीय सूत्रांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. (BJP is determined to contest more than 32 seats, NCP Ajit camp likely to be accommodated in two to three seats)

हे वाचलं का?

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेता एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि उपमुख्यमंत्री तथा देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली.

हेही वाचा >> शिवसेना, राष्ट्रवादीचे काही उमेदवार भाजपच्या तिकिटावर लढणार? 

तिन्ही नेत्यांसोबत बैठक झाल्यानंतर अमित शाह यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्यासोबत स्वतंत्र बैठका झाल्या. तसेच मुख्यमंत्री शिंदे, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि अमित शाह यांच्यात सुमारे पंचेचाळीस मिनिटे चर्चा झाली.

महायुतीत भाजपला 32 जागा, शिंदेंच्या शिवसेनेला किती?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत भाजप महाराष्ट्रात 32 पेक्षा जास्त जागा लढण्याचे ठरलं आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तीन ते चार जागाच मिळू शकतात. यात बारामती, रायगड, शिरूर किंवा मावळ या जागा दिल्या जाणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 10 पेक्षा जास्त जागा मिळणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा >> भाजपने एक जागा बळकावली, शिंदेंनी गमावली... अमित शाहांची भर सभेत 'ती' घोषणा! 

महायुतीमध्ये शिवसेनेला 10 जागा दिल्या जाणार आहेत. उर्वरित चार जागांवर उमेदवार शिवसेना-राष्ट्रवादीचे असतील, पण ते निवडणूक भाजपच्या कमळ चिन्हावर लढवतील असा फॉर्म्युला ठरला असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. 

शिवसेनेला सोडाव्या लागणार हक्काच्या जागा...

भाजप-शिवसेना युतीमध्ये ज्या जागा कायम शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या आहेत. त्यापैकी 12 जागा शिवसेनेला सोडाव्या लागणार आहेत. यात रत्नागिरी-सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, अमरावतीसह इतर महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. महत्त्वाचं म्हणजे मुंबईत शिवसेनेला एकच जागा दिली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

    follow whatsapp