Lok Sabha Election: भाजपने एक जागा बळकावली, शिंदेंनी गमावली... अमित शाहांची भर सभेत 'ती' घोषणा!
Chhatrapati sambhajinagar lok sabha: भाजपचे नेते अमित शाह यांनी जाहीर सभेत थेट घोषणा केली आहे की, छत्रपती संभाजीनगरची जागा भाजप लढवले. इथे एमआयएमच्या उमेदवाराचा पराभव करून तुम्ही एक कमळ मोदींना भेट द्या.. असं विधान शाह यांनी केलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर भाजपचा उमेदवार

अमित शाहांनी केली भर सभेत घोषणा

भाजपचा नेमका प्लॅन काय?
BJP Contest chhatrapati sambhajinagar lok sabha seat: छत्रपती संभाजीनगर: भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री यांनी आज (5 मार्च) छत्रपती संभाजीनगरमध्ये एक जाहीर सभा घेतली. ज्यामध्ये त्यांनी एक अशी घोषणा केली आहे की ज्याचा थेट परिणाम हा महायुतीच्या जागा वाटपांवर होणार आहे. ती घोषणा म्हणजे छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा ही भाजप स्वत: लढवणार असल्याची.. त्यामुळेच युतीत शिवसेनेकडे असलेली ही जागा भाजपने जागा वाटपाआधीच बळकावली असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. (bjp grabs one seat shinde loses amit shah announces that bjp will contest chhatrapati sambhajinagar lok sabha seat)
जाणून घ्या जाहीर सभेत अमित शाहांनी नेमकी काय घोषणा केली..
' नरेंद्र मोदी हे देशातील एकमेव नेते आहेत की, ज्यांना 14 देशांनी त्यांच्या देशातील सर्वोच्च पुरस्कार.. म्हणजे भारतरत्नसारखे पुरस्कार दिले आहेत. हा मोदींचा, भाजपचा सन्मान नाही. हा देशातील 130 कोटी जनतेचा आणि माझ्या संभाजीनगरमधील बंधू-भगिनींचा सन्मान आहे. मोदीजी जगात भारताचा सन्मान वाढवत आहेत.'
'काँग्रेसने काय केलं.. काँग्रेस पक्ष आणि घमेंडी आघाडी.. जे महाराष्ट्रात आमच्याविरोधात निवडणूक लढणार आहेत.. त्यांना ओळखा.. त्यांनी 370 कलम, ट्रिपल तलाक, ओबीसी आयोग बनवण्यास विरोध केला. रामजन्मभूमीच्या प्राणप्रतिष्ठापनेला देखील यांनी विरोध केला.'
हे ही वाचा> 'लोकसभेत महाराष्ट्र कमी पडणार नाही', पंकजा मुंडेनी अमित शाहांना शब्दच दिला
'ही लोकं काही चांगलं काम करू शकत नाही. देशाला जगात पुढे न्यायचं आहे तर केवळ मोदीजीच ते करू शकतात..'