VBA: 'महाविकास आघाडीची लपवाछपवीची रणनीती..', वंचितचं 'ते' पत्र जसंच्या तसं...

रोहित गोळे

28 Feb 2024 (अपडेटेड: 28 Feb 2024, 07:57 PM)

VBA and MVA: वंचित बहुजन आघाडीने आज महाविकास आघाडीला एक प्रस्ताव दिला. ज्याच्या सुरुवातीला त्यांनी अत्यंत कठोर शब्दात मविआला सुनावलं आहे. त्यानंतर एक प्रस्ताव देखील त्यांनी यावेळी दिला आहे.

वंचितने मविआला सुनावलं अन् प्रस्तावही दिला

वंचितने मविआला सुनावलं अन् प्रस्तावही दिला

follow google news

Vanchit Bahujan Aghadi proposal MVA: मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडली. ज्यामध्ये वंचित बहुजन आघाडी देखील सहभागी झाली होती. याच बैठकीत वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला एक प्रस्ताव दिला. ज्यामुळे आता एका नव्याच चर्चेला उधाण आलं आहे. (vanchit bahujan aghadi presented a proposal to mahavikas aghadi today proposal letter as it is)

हे वाचलं का?

मात्र, वंचित आघाडीने जो प्रस्ताव दिला आहे. त्यात सुरुवातीलाच असं म्हटलं आहे की, 'वंचित बहुजन आघाडीबद्दल महाविकास आघाडीची लपवाछपवीची रणनीती होती. आणि उदासीन वृत्ती लक्षात घेऊन, या आधी आम्ही ज्या मतदारसंघात निवडणुकीची पूर्ण तयारी केलेली.'

यावेळी 27 मतदारासंघाची यादीही वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीच्या बैठकीत सादर केली आहे. वाचा नेमका काय प्रस्ताव वंचितने मविआला दिला आहे. 

वंचित बहुजन आघाडीचा प्रस्ताव जसाच्या तसा

वंचित बहुजन आघाडीची कुठल्याही पक्षाशी आघाडी नसतांना वंचित बहुजन आघाडीने ज्या मतदारसंघात निवडणुकीची पूर्ण ताकदीने तयारी केली होती, त्या लोकसभा मतदारसंघाची यादी.

वंचित बहुजन आघाडीबद्दल महाविकास आघाडीची लपवाछपवीची रणनीती आणि उदासीन वृत्ती लक्षात घेऊन, या आधी आम्ही ज्या मतदारसंघात निवडणुकीची पूर्ण तयारी केलेली, त्या लोकसभा मतदारसंघाची यादी आम्ही तयार केली होती.

आता महाविकास आघाडीने आमच्या सोबत चर्चा सुरू केली आहे, तर आम्ही आमच्या त्या मतदारसंघांची यादी महाविकास आघाडीला देत आहोत. सदर यादी आम्ही स्वतंत्र गेलो असतो, तर त्यासाठी आम्ही तयार केली होती. आम्हाला आशा आहे की, या मतदारसंघांवर तीन पक्षांसोबत फलदायी चर्चा आणि वाटाघाटी होऊ शकतील. काही मतदारसंघ सोडून आम्ही खालील या जागांवर चर्चेला तयार आहोत.

वंचित बहुजन आघाडीचा मुख्य अजेंडा हा आहे की, विभाजनवादी भाजप-आरएसएसचा पराभव झाला पाहिजे आणि सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येऊन भाजपच्या विरोधात एकजुटीने लढले पाहिजे.

1. अकोला
2. अमरावती
3. नागपूर
4. भंडारा-गोंदिया
5. चंद्रपूर 
6. हिंगोली
7. उस्मानाबाद
8. औरंगाबाद 
9. बीड
10. सोलापूर
11. सांगली
12. माढा
13. रावेर
14. दिंडोरी
15. शिर्डी
16. मुंबई साउथ सेंट्रल
17. मुंबई उत्तर मध्य 
18. मुंबई उत्तर-पूर्व 
19. रामटेक
20. सातारा
21. नाशिक
22. मावळ
23. धुळे 
24. रावेर
25. नांदेड
26. बुलढाणा
27. वर्धा

महाविकास आघाडीला वंचित बहुजन आघाडीचा प्रस्ताव -

१) महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून जालना लोकसभा मतदारसंघातून श्री. मनोज जरांगे पाटील आणि पुणे लोकसभा मतदारसंघातून डॉ. अभिजित वैद्य यांना धमक कॉमन उमेदवार म्हणून जाहीर करावे.

२) महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या यादीत किमान १५ ओबीसी उमेदवार असावेत.

३) महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटक पक्षाने असे लेखी वचन दिले पाहिजे की, पक्ष किंवा त्यांचा निवडून आलेला उमेदवार निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर भाजपामध्ये सामील होणार नाही.

4) महाविकास आघाडीच्या उमेदवारांना यादीत किमान 03 अल्पसंख्यांक उमेदवार असावेत.


 

    follow whatsapp