Sharad Pawar : भाजपसोबत गेलेल्या कुणासोबतच... शरद पवार यांनी स्पष्ट केली भूमिका, मुख्यमंत्रीपदाबद्दल मोठं वक्तव्य

Sharad Pawar on CM Post: शरद पवार यांनी इंडिया टुडे समुहाचे कन्सल्टिंग एडीटर आणि ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

08 Nov 2024 (अपडेटेड: 08 Nov 2024, 03:30 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुख्यमंत्रीपदासाठी मविआचा फॉर्म्युला काय?

point

शिंदे आणि पवारांमध्ये चर्चा सुरू असल्यााचा मलिकांचा दावा खरा?

point

राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर काय घडणार?

Exclusive with Sharad Pawar on CM Post : विधानसभेचा निकालानंतर राज्यात काहीही घडू शकतं, कुणीही  कुणासोबत जाऊ शकतो असा सूचक इशारा Navab Malik यांनी दिला आहे. तसंच, शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यातही काहीतरी सुरू असल्याचं काही लोक म्हणतायत असं मलिक म्हणाले होते. त्यानंतर राज्यात सुरु विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू असलेल्या चर्चांमध्ये पुन्हा वेगवेगळे कयास लावले जात होते. त्यातच आता शरद पवार यांनी 'इंडिया टुडे' वृत्तसमुहाचे कन्सल्टिंग एडीटर आणि ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी शरद पवार अशा सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत. तसंच मुख्यमंत्रीपदाबद्दलही त्यांनी मोठं विधान केलं आहे.

हे वाचलं का?


हे ही वाचा >>Nana Patole : बदलापूरच्या 'त्या' शाळेत ब्ल्यू फिल्म बनवायचे, शरीराचे अवयव विकायचे, नाना पटोले यांचे खळबळजनक आरोप

 

'मुंबई तक' चावडीवर आलेल्या नवाब मलिक यांनी म्हटलं होतं की, "या निकालानंतर कोण कुणासोबत राहील हे सांगताच येत नाही, काही लोक म्हणतायत की, शिंदे साहेब आणि पवार साहेब यांचं काहीतरी सुरू आहे." नवाब मलिक यांच्या या विधानामुळे राज्यात 23 नोव्हेंबरनंतर नेमक्या काय घडामोडी घडणार याबद्दलचा सस्पेन्स आणखी वाढला होता. त्यानंतर आता शरद पवार यांनी आपण भाजपसोबत असलेल्या कुणाशीही युती करणार नाही... आमच्या आघाडीतील ज्या पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळतील त्यांना मुख्यमंत्री मिळेल असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे नवाब मलिक यांनी केलेला दावा त्यांनी फेटाळून लावला आहे. 

 

हे ही वाचा >>Uddhav Thackeray : गद्दारांना मोठं केलं, चूक झाली, माफ करा... ठाकरेंनी सांगितली 'वर्षा' सोडण्यापूर्वीची इनसाईड स्टोरी

 

महाविकास आघाडीला बहुमत मिळाल्यास मुख्यमंत्री कोण होईल? असा सवाल गेल्या अनेक दिवसांपासून पत्रकारांकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांना विचारला जात होता. त्यावर अजूनही स्पष्ट उत्तर मिळू शकलेलं नव्हतं. मात्र शरद पवार यांनी एका ते स्पष्ट केल्याचं दिसतंय. ज्या पक्षाच्या जागा जास्त येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल असं पवार म्हणाले आहेत. त्यामुळे मविआमध्ये कोण जास्त जागा घेणार यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

    follow whatsapp