Crime News: कौटुंबिक वादातून एका तरुणाने आपल्या मेहुणीचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित घटना ही दिल्लीच्या रोहिणी परिसरात घडली असून 27 वर्षीय फिजिओथेरेपिस्ट म्हणून कार्यरत असलेल्या एका तरुणीवर तिच्या दाजीने जीवघेणा हल्ला केला. वृत्तानुसार, आरोपी महिलेच्या वेशात पीडितेच्या थेरेपी सेंटरमध्ये शिरला आणि ब्लेडच्या साहाय्याने आपल्या मेहुणीचा गळा चिरला. यानंतर, गंभीररित्या जखमी झालेल्या तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून आरोपीला पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जय प्रकाश यादव अशी आरोपीची ओळख समोर आली असून तो एका कोचिंग सेंटरमध्ये शिक्षक आहे.
ADVERTISEMENT
महिलेच्या वेशात थेरेपी सेंटमध्ये शिरला...
प्राथमिक तपासात समोर आलं की, जवळपास वर्षभरापासून आरोपीचे त्याच्या पत्नीसोबत कौटुंबिक वाद सुरू होते. चौकशीदरम्यान, आरोपीने कबूल केलं की त्याला त्याच्या सासरच्या लोकांचा बदला घ्यायचा होता. पोलिसांच्या माहितीनुसार,आरोपीच्या सासरच्या लोकांनी त्याच्या आईवर हल्ला केला असल्याचं त्याने सांगितलं. वृत्तानुसार, घटनेपूर्वी आरोपीने संशय येऊ नये म्हणून डोक्यावर विग आणि महिलांचे कपडे परिधान केले होते. त्यानंतर, तो सेक्टर-24 मधील एका पीडिता कार्यरत असलेल्या एका थेरेपी सेंटरमध्ये पोहोचला.
आसपासच्या परिसरात सर्च ऑपरेशन
सोमवारी दुपारी जवळपास 12.21 वाजताच्या सुमारास, एका महिलेवर जीवघेणा हल्ला झाल्याची पोलिसांनी माहिती मिळाली. पीडितेचा गळा चिरण्यात आल्याचं कळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि गंभीररित्या जखमी तरुणीला त्वरीत रुग्णालयात नेण्यात आलं. आता, रुग्णालयात पीडितेवर उपचार सुरू असून ती सध्या जबाब देण्याच्या स्थितीत नसल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित घटनेनंतर, आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी बिल्डिंग आणि आसपासच्या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केलं.
हे ही वाचा: ऑर्केस्ट्रा मालकाने बळजबरीने दारू पाजली अन् जंगलात नेऊन अल्पवयीन नृत्यांगनेवर दोघांकडून बलात्कार...
दरम्यान, पोलिसांनी आरोपीला एका बिल्डिंगच्या छतावरून ताब्यात घेतलं. तिथे आरोपी तरुण लपून बसला होता. तसेच, पोलिसांनी घटनेत वापरण्यात आलेलं ब्लेडसुद्धा आरोपीकडून ताब्यात घेतलं. घटनास्थळी सील करून फॉरेन्सिक टीमकडून तपास केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा विस्तृत तपास केला जात असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT











