MBA च्या विद्यार्थीनीची बॉयफ्रेंडकडून हत्या, मुंबईत आणून मृतदेहासोबत दुष्कृत्य; आक्षेपार्ह व्हिडीओ कॉलेजच्या ग्रुपवर पाठवले

मुंबई तक

17 Feb 2026 (अपडेटेड: 17 Feb 2026, 09:10 AM)

MP Crime News : मुंबईत पोहोचल्यानंतरही तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थच होता. त्याने यूट्यूबवर आत्म्यांशी संपर्क साधण्यासंदर्भातील व्हिडीओ शोधले. त्यानुसार त्याने नालासोपारा परिसरातील एका निर्जन ठिकाणी कथित धार्मिक विधी करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्याने कुंकू, हळद, बांगड्या, बिंदी यांसारखी सौंदर्यप्रसाधने खरेदी केली होती. तरुणीचे आधार कार्ड आणि अंगठी त्याच्याकडे आधीपासूनच होती. त्या वस्तू समोर ठेवून व्हिडीओत सांगितलेल्या पद्धतीने विधी केल्यास ती स्वप्नात येऊन बोलेल, असा त्याचा समज होता.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

MBA च्या विद्यार्थीनीची बॉयफ्रेंडकडून हत्या, मुंबईत मृतदेहासोबत दुष्कृत्य

point

आक्षेपार्ह व्हिडीओ कॉलेजच्या ग्रुपवर पाठवले

MP Crime News : मध्य प्रदेशातील इंदूर येथे एमबीएच्या विद्यार्थीनीच्या हत्याप्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी विद्यार्थी पियूष धामनोदिया याची मानसिक अवस्था खून केल्यानंतर अधिकच बिघडत गेल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. हत्या केल्यानंतरही तो तरुणीला विसरू शकत नव्हता. तिच्या आत्म्याशी संवाद साधण्यासाठी त्याने अंधश्रद्धेचा आधार घेतल्याचे तपासात समोर आले आहे.

हे वाचलं का?

द्वारकापुरी पोलीस ठाण्यातील चौकशीत आरोपी अनेकदा भावुक होऊन रडू लागला आणि मृत तरुणीशी बोलण्याची हट्टाने मागणी करू लागला. पोलिसांनी त्याला समजावून सांगितले की तिचा मृत्यू झाला असून आता काहीही शक्य नाही. त्यानंतर त्याने हत्येची कबुली दिली. गुन्ह्यानंतर त्याने मद्यप्राशन केले आणि थेट मुंबईकडे पळ काढला, अशी माहितीही त्याने दिली.

मुंबईत पोहोचल्यानंतरही तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थच होता. त्याने यूट्यूबवर आत्म्यांशी संपर्क साधण्यासंदर्भातील व्हिडीओ शोधले. त्यानुसार त्याने नालासोपारा परिसरातील एका निर्जन ठिकाणी कथित धार्मिक विधी करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्याने कुंकू, हळद, बांगड्या, बिंदी यांसारखी सौंदर्यप्रसाधने खरेदी केली होती. तरुणीचे आधार कार्ड आणि अंगठी त्याच्याकडे आधीपासूनच होती. त्या वस्तू समोर ठेवून व्हिडीओत सांगितलेल्या पद्धतीने विधी केल्यास ती स्वप्नात येऊन बोलेल, असा त्याचा समज होता.

हेही वाचा : 'तिच्यासाठी सगळ्यांना सोडलं, अन् आता तीच सोडून गेली'; सासूसोबत पळून गेलेल्या जावयाला गुलीगत धोका

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीची मानसिक स्थिती सामान्य नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. तथापि, या संदर्भात वैद्यकीय तपासणी अहवालानंतरच अंतिम निष्कर्ष काढला जाणार आहे.

दरम्यान, तपासात आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. आरोपीने तरुणीसोबतचे आक्षेपार्ह व्हिडीओ कॉलेजच्या ग्रुपवर शेअर केल्याचे उघड झाले आहे. गुन्ह्यानंतर तो रेल्वेने मुंबईला गेला. प्रवासादरम्यानच त्याने हा व्हिडीओ शेअर केला तसेच त्याच मोबाईलवरून व्हॉट्सअॅप स्टेटसही ठेवले. कुटुंबीयांची दिशाभूल करण्यासाठी त्याने तरुणीच्या मोबाईलवरून “घरी येणार नाही” असे संदेशही पाठवले होते.

मुंबईत पोहोचल्यानंतर त्याने स्वतःचा मोबाईल फोडून टाकल्याची कबुली दिली आहे. आता तो मोबाईल जप्त करण्यासाठी पोलिस आरोपीला मुंबईत नेण्याची तयारी करत आहेत. तसेच आरोपीच्या खोलीची चावी अद्याप सापडलेली नाही. चौकशीत त्याने फूटी कोठी चौकाजवळ किल्ली फेकल्याचे सांगितले असून पोलिस त्या परिसरात शोधमोहीम राबवत आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे इंदूरसह राज्यात मोठी खळबळ उडाली असून तपास यंत्रणा सर्व बाजूंनी चौकशी करत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

'तिच्यासाठी सगळ्यांना सोडलं, अन् आता तीच सोडून गेली'; सासूसोबत पळून गेलेल्या जावयाला गुलीगत धोका