मुंबईतील शिवाजीनगर परिसरात दुपारी गोळीबार, बॉयफ्रेंडशी जवळीकता साधत होती तरुणी, गर्लफ्रेंडनं झटक्यात केलं खल्लास

Mumbai Crime : मुंबईतील शिवाजीनगर परिसरात मंगळवारी धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या खळबळजनक घटनेत हत्येचं गूढ पोलिसांनी उकलले आहे. या प्रकरणी संबंधित आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. हत्या करण्यात आलेल्या तरुणीचं नाव शिफा (वय 19) असे आहे. जेव्हा हे प्रकरण उघडकीस आले असता, परिसर हादरून गेला.

mumbai crime

mumbai crime

मुंबई तक

• 08:00 AM • 17 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

बईतील शिवाजीनगर परिसरात धक्कादायक प्रका

point

फुरकानिया परिसरात दुपारी गोळीबार

point

नेमकं काय घडलं?

Mumbai Crime : मुंबईतील शिवाजीनगर परिसरातून मंगळवारी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या खळबळजनक घटनेत हत्येचं गूढ पोलिसांनी उकलले आहे. या प्रकरणी संबंधित आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. हत्या करण्यात आलेल्या तरुणीचं नाव शिफा (वय 19) असे आहे. जेव्हा हे प्रकरण उघड झाले, तेव्हा हा खून प्रेमप्रकरणातून झाला असावा असा संशय व्यक्त केला होता. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : वंदे भारत रेल्वेच्या शौचालयाच साप ठेवणारा आरोपी मुंब्रा येथून अटक, सीसीटीव्हीतून धक्कादायक प्रकार उघड

फुरकानिया परिसरात दुपारी गोळीबार

फुरकानिया परिसरात दुपारी गोळीबार झाला होता. 19 वर्षीय शिफावर जवळून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात शिफा गंभीर जखमी झाल्याचे वृत्त समोर आले, दरम्यान रुग्णालयात नेताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं मुंबई पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. 

पोलिसांनी सापळा रचत दोन संशयित आरोपींच्या आवळल्या मुसक्या

हे प्रकरण लक्षात घेता, शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने हत्येचा तपास सुरु केला. तसेच सीसीटीव्ही फुटेजची देखील माहिती घेऊन पोलिसांनी सापळा रचत दोन संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या. अटकेत असलेले आरोपी 25 वर्षीय महिला आणि 23 वर्षीय तरुण आहे. 

सुरुवातीला पोलीस तपासातून समोर आले की, हा कट   प्रेमसंबंधाच्या वादातूनच रचल्याचा संशय आहे. आरोपी महिलेला शिफा तिच्याच बॉयफ्रेंडशी जवळीकता साधत असल्याचा संशय होता, ज्यामुळे शिफा आणि आरोपीमध्ये मोठा वाद झाला होता. 

हे ही वाचा : अकरावीच्या विद्यार्थिनीवर वेगवेगळ्या ठिकाणी थारमध्ये अत्याचार, व्हिडिओ रेकॉर्ड करत व्हायरल करण्याची दिली धमकी

या प्रकरणी पोलिसांनी पुष्टी केली की, ही हत्या वैयक्तिक संबंधातून किंवा प्रेमप्रकरणातून झाली असावी. संबंधित तरुणीने आपल्या जोडीसादारासोबतच असे गुन्हे केले होते. पोलिसांनी आरोपीविरुद्ध हत्येशी संबंधित दंड संहिता कलमांन्वये गुन्हा दाखल केला. 

    follow whatsapp