मुंबईतही अनेक 'हगवणे', हुंड्यासाठी सुनांचा छळ, 16 महिन्यात तब्बल 627...

मुंबई तक

29 May 2025 (अपडेटेड: 29 May 2025, 03:59 PM)

मुंबईतही हुंडाबळीच्या घटना सर्रास घडत असल्याचं पाहायला मिळतं. आजच्या काळात सुद्धा हुंड्याच्या प्रथेमुळे मुंबईत देखील घरगुती हिंसाचाराचे प्रमाण वाढले आहे. जाणून घ्या, सविस्तर आकडेवारी.

मुंबईतही हुंड्यासाठी महिलांचा शारीरिक छळ

मुंबईतही हुंड्यासाठी महिलांचा शारीरिक छळ

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुंबईतही हुंडा प्रथेच्या घटना कायम

point

मुंबईत हुंड्यामुळे किती महिलांनी जीव गमवला?

point

मुंबईत हुंडाबळीचे किती गुन्हे दाखल?

Mumbai news: भारतात  हुंडाप्रतिबंधक कायद्यानुसार लग्न ठरवताना वधूच्या कुटुंबाकडून घेतला जाणारा हुंडा बेकायदेशीर असला तरी यासंबंधी बऱ्याच घटना भारतात घडत असल्याच्या पाहायला मिळतात. वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणामुळे भारतात एकच खळबळ उडाली आहे. खरंतर, विकासाच्या दृष्टीने आधुनिक मानल्या जाणाऱ्या मुंबईतही हुंडाबळीच्या घटना सर्रास घडत असल्याचं पाहायला मिळतं. आजच्या काळात सुद्धा हुंड्याच्या प्रथेमुळे मुंबईत देखील घरगुती हिंसाचाराचे प्रमाण वाढले आहे. 

हे वाचलं का?

दीड वर्षात 600 हून अधिक गुन्हे

मुंबई पोलिसांनी यासंबंधीच्या बऱ्याच तक्रारी तसेच गुन्हे दाखल केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दीड वर्षात मुंबईत याप्रकरणातील 600 हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबईसारख्या शहरातसुद्धा दिवसात एक ते दोन महिला हुंड्यामुळे घरगुती हिंसाचाराला बळी पडत असल्याची माहिती मिळाली आहे. 

हे ही वाचा: लग्नाच्यावेळी पत्नीच्या पोटात होतं बॉयफ्रेंडचं बाळ, सत्य समजताच पतीचा गेला जीव

घरगुती हिंसाचाराचा सामना

यामध्ये फक्त गृहीणींचाच नव्हे स्वबळावर स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करण्याच्या प्रयत्नात बाहेर पडणाऱ्या महिलांचा सुद्धा समावेश आहे. अशा महिलांना देखील घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागत असल्याचं समोर आलं आहे. मागील 16 महिन्यांमध्ये हुंड्यामुळे शारीरिक छळाच्या 627 घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये बऱ्याच महिलांनी सासरच्या हुंडा प्रथेशी संबंधित जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे वृत्त देखील समोर आले आहेत. 

हे ही वाचा: आरारारारा खतरनाक! Sperm डोनेट करून बनला 67 पोरांचा बाप, पण 10 मुलांच्या जीवाला धोका, कारण काय?

महिलांसंबधी इतक्या गुन्ह्यांची नोंद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत 2025 वर्षातील एप्रिल महिन्यात अशा प्रकरणातील म्हणजेच महिलांविषयी 8636 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  हुंड्यामुळे एकूण 25 महिलांचा मृत्यू झाला असून त्यातील 16 महिलांनी स्वत:चं जीवन संपवलं. आता पोलिसांकडून अशा प्रकारच्या गुन्ह्यांच्या दृष्टीने काळजीपूर्वक आणि संवेदनशील पद्धतीने पाऊल उचलून त्यांच्या विरुद्ध कारवाई केली जात आहे. इतकेच नव्हे तर या दृष्टीने समोपचाराचा देखील प्रयत्न केला जात आहे.