लग्नाच्यावेळी पत्नीच्या पोटात होतं बॉयफ्रेंडचं बाळ, सत्य समजताच पतीचा गेला जीव
Crime news : पत्नीच्या पोटात तिच्या बॉयफ्रेंडच्या बाळ वाढत होतं. ही सत्य परिस्थिती समजताच तरुणाने विवाहाच्या तीन महिन्यानंतर आत्महत्या केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
विवाहानंतर तरुणाने केली आत्महत्या
आत्महत्येचं कारण ऐकूण बसेल धक्का
Crime News : उत्तर प्रदेशातील झांसी बबीना ठाणे परिसरातील लहर ठकुरपुरा गावातील रहिवासी बृजेंद्र रायकर या तरुणाचा नुकताच विवाह झाला होता. तरुणाची पत्नी ही ललितपुर येथील रहिवासी होती. मात्र तीन महिन्यानंतर पतीने आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना आहे. विवाहानंतर तरुणाने आत्महत्या का केली? असा अनेकांना प्रश्न उपस्थित झाला आहे. या आत्महत्येचं कारण आता समोर आलं आहे.
हेही वाचा : भाजप आमदाराच्या बंगल्यात घुसून गोंधळ, पोलिसांनाही शिवीगाळ पुण्यात चाललंय तरी काय?
पीडित तरुणाच्या कुटुंबियांनी सुनवली खरी खोटी
बृजेंद्रच्या कुटुंबाने दावा केला की, तिच्या माहेरी एका तरुणासोबत तिचं अफेयर होतं आणि विवाहादरम्यान ती गर्भवती होती. तिच्या पोटात दुसऱ्याचंच बाळ वाढत होतं. त्यामुळे तरुण या विवाहानंतर आनंदी नव्हता. पीडित कुटुंबाचं म्हणणं होतं की, त्यांना याबाबत कोणतीही माहिती नव्हती. या मुद्द्यावरुन घरात दररोज वाद होत होता. यानंतर खरं कारण समोर आलं आहे. पीडित तरुणाला याच मुद्द्यावरुन पत्नीची आई आणि पत्नी सतत धमकी देत होती. या वादाला कंटाळून पीडित तरुणाने आत्महत्या केली.
बृजेंद्रची आई गुलाब देवी यांनी आरोप केला की, लग्नानंतर आमचा मुलगा आनंदी होता. पण आमच्या सुनेच्या चेहऱ्यावर नेमही बारा वाजलेले असायचे. ती फक्त भांडण करत होती. पत्नीचं माहेरी एका तरुणासोबत अफेयर होतं. तिच्या पोटात त्याचंच मुल वाढत होतं. विरोध केल्यानंतर तिने पीडित तरुणाला अनेकदा धमकी दिली.
पीडित तरुणाच्या आईनं सांगितलं की, त्यांनी एवढं होऊनही हे सर्व स्वीकारलं होतं. मात्र, एवढं होऊनही पत्नी आणि पीडित मृत तरुणाच्या सासूने अनेकदा धमकी दिली.










