पुणे: 'मला गेले दीड, दोन वर्ष जे जाणवत होतं काश्मीरबद्दलचं.. अनेकांशी मी गेले वर्षभर बोलतोय.. की, काश्मीरमध्ये काही तरी मोठी घटना घडेल. तुमचा विश्वास नाही बसणार.. मी हे ही बोललो होतो की, पर्यटकांना मारतील.' असा अत्यंत खळबजनक दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. मुंबई Tak जय हिंद कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी हे विधान केलं आहे.
ADVERTISEMENT
मुंबई Tak जय हिंद उत्सव या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी विशेष मुलाखत घेण्यात आली. ज्यावेळी पहलगाम दहशतवादी हल्ला, भारताचा पाकिस्तानवर हल्ला या सगळ्याबाबत राज ठाकरे यांनी हे विधान केलं आहे.
हे ही वाचा>> 'ठाकरे-पवार ब्रँड संपविण्याचा प्रयत्न, पण... मी लिहून देतो', राज ठाकरेंचं जय हिंद उत्सवात मोठं विधान
'शपथपूर्वक सांगतोय.. हे मी गेले वर्षभर सांगतोय...', दहशतवादी हल्ल्याबाबत राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
'तुम्ही मला म्हणाले ना मघाशी की, सगळे उजीवकडे जातात आणि तुम्ही डावीकडे जातात.. पण मला काही धोके दिसतात.. तुमचा कोणाचा विश्वास बसणार नाही. आता ती व्यक्ती नाही इथे.. पण अनेक जण आहेत ज्यांच्या मी तुम्हाला भेटी करून देईन. मी कोणी ज्योतिषी नव्हे.'
'मी अनेकदा सांगितलं आहे.. मी मागच्या वेळेस पण सांगितलं होतं आठवतंय तुम्हाला? युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल.. मागील 3-4 वर्षांपूर्वी.. सांगितलं होतं आठवतंय तुम्हाला? मी भाषणातच सांगितलं होतं. यावेळेला ही गोष्ट फक्त मी बोललो नाही. कारण मला कोणत्याही प्रकारची हिंट द्यायची नव्हती.'
'कारण मी, राज ठाकरे हिंट दिली किंवा राज ठाकरेने सगळं सांगितलं असं व्हायला नको होतं म्हणून मी ही गोष्ट जाहीररित्या कधी कुठे बोललो नव्हतो. पण तुम्हाला मी आता जे सांगतोय ते सत्य आहे. शपथपूर्वक सांगतोय.. गेले वर्षभर.. आमचे अनिल शिदोरे असतील किंवा.. इतर लोकं असतील. मी त्यांच्या भेटी घालून देईल तुम्हाला.'
हे ही वाचा>> मुंबई Tak जय हिंद उत्सव: 'आपली मराठी मुलं रिल्स...' हिंदी भाषेवर राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'अनेकांशी मी गेले वर्षभर बोलतोय.. की, काश्मीरमध्ये काही तरी मोठी घटना घडेल. तुमचा विश्वास नाही बसणार.. मी हे ही बोललो होतो की, पर्यटकांना मारतील. जे 370 कलम रद्द झाल्यानंतर काश्मीरमधील परिस्थिती होती. आपले लोकं तिकडे जात होते, खेळत होते.. सगळ्या गोष्ट होत होत्या.'
'मला गेले दीड, दोन वर्ष जे जाणवत होतं काश्मीरबद्दलचं.. काय आहे की, शांतता आणि सन्नाटा यातील फरक तुम्हाला समजला पाहिजे. शांतता ही चांगली असते, सन्नाटा ही गंभीर गोष्ट असते. काश्मीरबद्दल मला जे जाणवत होतं तो सन्नाटा होता. त्यातून बाहेर काय-काय गोष्टी पडतील ते मला माहीत नाही. पण ज्या दिवशी ही घटना घडली.. मी तुम्हाला आतापण मोबाइल फोन दाखवायला तयार आहे.'
'अनिल शिदोरेंचा मेसेज आहे की, 'तुम्ही बोललात तसे झाले' त्या दिवशीचा मेसेज आहे त्यांच्याकडे.. मी कोणी भविष्यवेत्ता नाही किंवा ज्योतिषी नाही. माझे काही ठोकताळे आहेत, माझे काही अंदाज आहेत. मला आतून काही वाटतं की, या गोष्टी घडतील.'
'मी त्या प्रकारे सांगतोय हे.. मी काही निवडणुकीसाठी बोलत नाही. माझ्यावर विश्वास ठेवा.' असा दावा राज ठाकरे यांनी यावेळी केला आहे.
पाहा 'मुंबई Tak जय हिंद उत्सव'मधील राज ठाकरे यांची संपूर्ण मुलाखत
ADVERTISEMENT
