Raj Thackeray: पुणे: टसर्व राज्य आपल्या भाषेसाठी कडवट असतात. आपली भाषा वाढवत असतात आणि समृद्ध करत असतात. मात्र, महाराष्ट्राने आतापर्यंत देशाचाच विचार केला आहे. हे अनेकदा याआधी मी सांगत आलोय. मी आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं आहे की, आधी हात जोडा आणि ऐकत नसेल तर हात सोडा. कारण हात सोडण्याशिवाय पर्याय नाही. दर कोणी ऐकत नसेल तर हाच पर्याय आहे.' असे म्हणत राज ठाकरे यांनी मराठी भाषेवबाबत भाष्य केलं आहे. मुंबई Tak च्या 'जय हिंद उत्सवा'त ते बोलत होते. यावेळी 'मुंबई तक'चे संपादक साहिल जोशी आणि मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली.
ADVERTISEMENT
हेही वाचा : मुंबई Tak जय हिंद उत्सव: निवडणुका, युती आणि बरंच काही.. राज ठाकरेंची Exclusive मुलाखत LIVE
राज्य सरकारने नवीन शैक्षणिक धोरणाविषयीचा निर्णय घेतला होता. मात्र, याला मनसेनं परिपूर्ण विरोध दर्शवला. त्यानंतर मुलाखतीदरम्यान, राज ठाकरे यांना याबाबत विचारले असता, ते म्हणाले की, मी हे होऊनच देणार नाही. सरकारने जरी हा निर्णय मागे घेतला असला, तरीही मी इतर भाषांची पुस्तक शाळांपर्यंत पोहोचवून देणार नाही. त्यानंतर त्यांनी हिंदी भाषेवर आपलं मत मांडलं की, हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. जशी मराठी राजभाषा आहे तशीच जागतिक पातळीवर इंग्रजी ही भाषा आहे. या दोन महत्त्वपूर्ण भाषा आहेत. ज्याला हिंदी शिकायची आहे त्याने ती भाषा शिकावी. आतापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये इतर तिसरी कोणती भाषा होती का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
विद्यार्थ्यांनी तिसरी भाषा का शिकावी?
यावेळी बोलताना त्यांनी मराठी भाषेला मनोरंजनाच्या दृष्टीकोनातून कसं डावललं गेलं आहे हे सांगितलं. ते म्हणाले की, हिंदीची सक्ती यासाठी नको कारण , विद्यार्थ्यांनी तिसरी भाषा का शिकावी? त्यांना जे शिकायचं आहे ते शिकतील. त्यांना फ्रेंच, चायनिज वगैरे जी भाषा शिकायची ती भाषा ते शिकून घेतील. तुमचे हिंदी चॅनेल्स, बातम्या, चित्रपट पाहण्यासाठी हिंदीची सक्ती सुरु आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मराठी मुलं हिंदीतून रिल्स का करतात?
सध्या सोशल मीडियावर मराठी रिल्सस्टार सर्वांपर्यंत रिल्स पोहोचाव्यात म्हणून हिंदी भाषेतून रिल्स करतात. काशाला हिंदी भाषेतून त्यांनी रिल्स कराव्यात? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. अशावेळी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी मरठी माध्यमांच्या शाळा कामी होत आहेत यावरून प्रश्न करतात. त्यावर राज ठाकरे म्हणाले की, मी ज्या शाळेत शिक्षण घेतलं सध्या ती शाळा सेमी इंग्रजी माध्यमाची असावी. इंग्रजी शिकणे हे चुकीचं नाही, पण त्यासोबत मराठी भाषा असणे महत्त्वाचं असल्याचं राज ठाकरे म्हणाले आहेत. हिंदी भाषेची सक्ती आता भाजप करत आहे हे मी होऊन देणार नाही. याआधी काँग्रेसनेही हेच केलं आहे. मात्र, हे होणार नाही, असे राज ठाकरे म्हणाले.
हेही वाचा : मुंबई Tak जय हिंद उत्सव: 'ये देश है वीर जवानों का'.. अंगावर रोमांच आणणारी सरहद ग्रुपची गाणी
नरेंद्र मोदी आणि अमित शाहांना अंबानी हे जवळचे का वाटतात?
इंग्लंडमध्येही इंग्रजी बोलावी लागेल असे तिकडचे राष्ट्राध्यक्ष म्हणतात मग महाराष्ट्रातच का भाषेवर प्रश्न निर्माण होतो, असे राज ठाकरे म्हणाले. अनेकदा मराठी मुस्लिमही घरात मराठीतच बोलतात. भारतीय माजी क्रिकेटपटू झहीर खान माझ्यासोबत मराठीतच बोलतो, असे राज ठाकरे म्हणाले. त्यानंतर त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाहांना अंबानी हे जवळचे का वाटतात? असा प्रश्न उपस्थित केला.
ADVERTISEMENT
