Mumbai Tak Jai Hind Utsav in Pune: पुणे: इंडिया टुडे (India Today) ग्रुपची मराठी डिजीटल वाहिनी मुंबई Tak तर्फे 'मुंबई Tak जय हिंद उत्सवाचे' आयोजन पुण्यात येत्या शुक्रवारी, 23 मे रोजी करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण असणार आहे राज ठाकरे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत 'जय हिंद उत्सवात' घेतली जाणार आहे.
ADVERTISEMENT
पहलगाम हल्ल्यानंतर झालेल्या कारवाईत भारताने पाकिस्तानला सळो की पळो करून सोडले होते. भारतीय जवानांची शौर्यगाथा आणि त्यांच्या अतुलनीय साहसाबद्दल भारताचे माजी लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांचीही प्रकट मुलाखत या उत्सवात होणार आहे. महत्वाचे म्हणजे पुणेकर रसिकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य ठेवण्यात आला आहे.
आपल्या देशाचा उत्सव, मुंबई Tak जय हिंद उत्सव या संकल्पनेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात सरहद ग्रुपच्या मजहर सिद्दीकी आणि शमीमा अख्तर या कलाकारांकडून कार्यक्रमाच्या सुरूवातीला पसायदान आणि देशभक्तीपर गाणी सादर केली जाणार आहेत.
गेली 21 वर्ष मराठी रसिकांच्या मनात घर करणारा सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांचा 'आयुष्यावर बोलू काही..' या संगीतमय कार्यक्रमाची पर्वणीही उत्सवात असणार आहे.
तसेच गेली 50 हून जास्त वर्ष मराठी गझलेच्या दुनियेत अधिराज्य गाजवणारे गायक भीमराव पांचाळेंची गजल मैफिलही रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.
तर आपल्या ठसकेबाज अदाकारीने रसिकांना घायाळ करणाऱ्या लावणी कलाकारांचा लावण्यवती हा कार्यक्रम देखील आपल्याला पाहता येईल.
तसेच भारतीय डिजीटल पार्टी अर्थात भाडिपाचे स्टॅडअप काँमेडियनही आपली विनोदी स्कीट या उत्सवात सादर करणार आहेत.
विशेष म्हणजे राज ठाकरेंची मुलाखत मुंबई Tak चे संपादक साहिल जोशी आणि प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक केदार शिंदे हे मिळून घेणार आहेत. शुक्रवारी 23 मे रोजी पुण्यातील शिवाजीनगर येथील मॉडर्न इंजिनियरिंग कॉलेज ऑडिटोरियममध्ये संध्याकाळी 4 वाजल्यापासून मुंबई Tak जय हिंद उत्सवाची दिमाखात सुरूवात होणार आहे.
हा कार्यक्रम संपूर्णपणे विनामूल्य आहे. त्यामुळे पुणेकर रसिकांना या बातमीद्वारे आम्ही भरभरून प्रतिसाद देण्यासाठी आमंत्रित करत आहोत. या मुंबई Tak आपली वाट पाहतंय...
ADVERTISEMENT
