Jyoti Malhotra : भारत-पाकिस्तान संघर्षात सिमेपलीकडच्या अडचणींचा बंदोबस्त भारतीय सैन्याने केला. मात्र, त्यानंतर आता देशाच्या आत बसून देशविरोधी कामं करणारे सध्या यंत्रणांच्या रडारवर आहेत. यामध्ये सर्वात जास्त चर्चा होतेय, ती ज्योती मल्होत्रा या युट्यूबरचीच. आतापर्यंत हरियाणा पोलिस, आयबी, एनआयए आणि गुप्तचर लष्करी अधिकाऱ्यांच्या पथकाने ज्योतीची चौकशी केली आहे. या चौकशीदरम्यान ज्योतीने महत्वाची कबुली दिली.
ADVERTISEMENT
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानच्या सूचनेनुसार काम करत होती, हे आता जवळजवळ स्पष्ट झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. पाकिस्तान उच्चायुक्तालयाचा अधिकारी दानिश हा ज्योतीच्या सतत संपर्कात होता, हे सुद्धा आता स्पष्ट झालंय.
हे ही वाचा >> स्वतःचे Video पॉर्न साइटवर अपलोड करणाऱ्या डॉक्टरची खरी कहाणी आली समोर!
तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांच्या मते, ज्योतीची कबुली अशी आहे की, माझे 'ट्रॅव्हल विथ-जो' नावाचे यूट्यूब चॅनेल आहे. माझ्याकडे पासपोर्ट क्रमांक आहे. 5609** आहे. 2023 मध्ये मी पाकिस्तानला भेट देण्यासाठी व्हिसा मिळविण्यासाठी दिल्लीतील पाकिस्तान दुतावासात गेले होते. तिथे माझी भेट अहसान-उर-रहीम उर्फ दानिशशी झाली. मी दानिशचा 981*** हा मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर मी दानिशशी बोलू लागले. त्यानंतर मी दोनदा पाकिस्तानला भेट दिली. तिथे मी दानिशच्या विनंतीवरून, त्याच्या ओळखीच्या अली हसनला भेटले. अली हसनने माझ्या राहण्याची आणि प्रवासाची व्यवस्था केली होती. पाकिस्तानमध्ये, अली हसनने माझी पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत भेट आयोजित केली. तिथे मी शाकीर आणि राणा शाहबाज यांना भेटले. मी शाकीरचा मोबाईल नंबर घेतला आणि तो 'जाट राधावंश' या नावाने माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह केला जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. मग मी भारतात परत आले. यानंतर, मी व्हॉट्सअॅप, स्नॅपचॅट आणि टेलिग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन सतत या सर्वांच्या संपर्कात होते.
हे ही वाचा >> दहावीत 96 टक्के पडलेल्या विद्यार्थीनीने स्वत:ला संपवलं, परीक्षा सुरू असताना वसतिगृहात स्कार्फने...
पाकिस्तानी हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या ज्योतीला पाच दिवसांची कोठडी देण्यात आली होती. या काळात वेगवेगळ्या यंत्रणांनी तिला अनेक प्रश्न विचारले. ज्योतीच्या वारंवार पाकिस्तान भेटी आणि पाकिस्तान उच्चायुक्तालयात तिला मिळणाऱ्या प्रवेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. ज्योतीच्या माध्यमातून पाकिस्तानला काय साध्य करायचं होतं, हे सध्या यंत्रणा जाणून घेत आहेत.
यंत्रणांना ज्योतिकडून हवी आहेत या प्रश्नांची उत्तरं....
- 2023 मध्ये ज्योतीची पाकिस्तान भेट खरोखरच आध्यात्मिक होती की पूर्वनियोजित कटाचा भाग होती?
- एहसान दारशी तिची ओळख कोणी आणि का करुन दिली?
- ज्योतिला पाकिस्तानस्थित हँडलर्सकडून आर्थिक किंवा डिजिटल मदत मिळाली का?
- पहलगाम हल्ल्यानंतर चित्रित केलेला व्हिडिओ खरोखरंच त्याची स्वतःची कल्पना होती? की एखाद्या हँडलरकडून मिळालेली ब्रीफिंग होती?
दरम्यान, या तपासादरम्यान पोलिसांना एक तुटलेला मोबाईल फोनही सापडला आहे. हा फोन जप्त करून फॉरेन्सिक टीमकडे पाठवण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मोबाईलमधून डिलीट केलेला डेटा रिकव्हर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणात हा मोबाईल एक मोठा सुगावा ठरू शकतो. ज्योतीला गुरुवारी हिसार न्यायालयात हजर केले जाईल.
आतापर्यंत 12 जणांना अटक
गेल्या 15 दिवसांत हेरगिरीच्या आरोपाखाली पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील एकूण 12 जणांना अटक करण्यात आली आहे. तपासात असं दिसून आलं आहे की, हे पाकिस्तानशी जोडलेल्या एका मोठ्या हेरगिरी नेटवर्कचा भाग असू शकतात. उत्तर भारतात हे नेटवर्क सक्रिय आहे.
हे ही वाचा >> तरूणीला लिफ्ट दिली, शेतात घेऊन जात तिघांकडून अत्याचार, नंतर पीडितेला म्हणाले...
दरम्यान, सध्या अशा अनेक यूट्यूब चॅनेलची सखोल चौकशी केली जात आहे. काही चॅनेल्स पुन्हा पुन्हा नवीन नावांनी उदयास येतात आणि सोशल मीडियाद्वारे दिशाभूल करणारे आणि देशविरोधी मजकूर पसरवतात. सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस मुख्यालय आणि सीआयडी पातळीवर एक देखरेख कक्ष कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलंय. जर कोणतीही आक्षेपार्ह लिंक किंवा कटेंट आढळला तर त्यावर कठोर कारवाई केली जाईल असं सांगण्यात आलंय.
ADVERTISEMENT
