तरूणीला लिफ्ट दिली, शेतात घेऊन जात तिघांकडून अत्याचार, नंतर पीडितेला म्हणाले...
पीडित मुलगी तिच्या आजीच्या घरी एकटीच चालत जात होती. वाटेत आरोपी प्रतीक सुनील साटोणे (26 वर्ष) याने तिला थांबवलं आणि सांगितलं की मी तुला तुझ्या आजीच्या घरी सोडतो.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
चंद्रपूरमध्ये हादरवून टाकणारी घटना
ओळखीच्याच तरूणांनी केला तरूणीवर अत्याचार
Chandrapur Crime News | विकास राजूरकर : चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. तीन तरुणांनी 19 वर्षांच्या मुलीला शेतात नेऊन सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली. या प्रकरणात चिमूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन आरोपींना अटक केली. तिसरा आरोपी अजूनही फरार असून त्याचा शोध सुरू आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून पोलिसांना खळबळजनक माहिती मिळाली आहे.
पीडित मुलगी तिच्या आजीच्या घरी एकटीच चालत जात होती. वाटेत आरोपी प्रतीक सुनील साटोणे (26 वर्ष) याने तिला थांबवलं आणि सांगितलं की मी तुला तुझ्या आजीच्या घरी सोडतो. पीडित मुलगी त्याला ओळखत होती, दोघंही एकाच परिसरात राहत होते. त्यामुळे पीडितेने विश्वास ठेवला आणि ती त्याच्या दुचाकीवर बसली. पण आरोपीने तिला आजीच्या घराकडे नेण्याऐवजी गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या त्याच्या शेतात नेलं. तिथं बांधलेल्या झोपडीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
हे ही वाचा >> धो धो...! पुण्यात मुसळधार पावसामुळे भलंमोठं होर्डिंग कोसळलं, घाटकोपर दुर्घटनेची पुनरावृत्ती
त्यानंतर प्रतीकने त्याचे दोन मित्र विक्रम उर्फ विक्की खुशाल सातोने (29 वर्ष) आणि अंकित संजय काकडे (31 वर्षे) - यांनाही तिथं बोलावलं. त्यानंतर तिघांनीही मुलीवर सामूहिक बलात्कार केला. जर याबद्दल कुणाला काही सांगितलं तर तुला जीवे मारून टाकू अशी धमकीही आरोपींनी दिली.
त्यामुळे तरूणी खूप घाबरली. एप्रिल महिन्यात घडलेली ही घटना पीडितेनं कुणालाच सांगितली नव्हती. बदनामीच्या भीतीने पीडिता आतापर्यंत गप्प राहिली, पण या घटनेमुळे ती अस्वस्थ होती. त्यामुळे तिने मोठी हिंमत करुन पोलीस स्टेशन गाठलं.










