धो धो...! पुण्यात मुसळधार पावसामुळे भलंमोठं होर्डिंग कोसळलं, घाटकोपर दुर्घटनेची पुनरावृत्ती
Rain Update : पुण्यात मुसळधार पावसाने होर्डिंग कोसळलं आहे. ग्रामीण पुण्यासह शहरी भागात पावसाने धिंगाणा घातला आहे. पुण्यातील सणसवाडी परिसरात होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मान्सून दाखल होण्याआधी राज्यातील काही जिल्ह्यांना आणि शहरांना अवकाळी पावसाने झोडपलं आहे.
ग्रामीण पुण्यासह शहरी भागात पावसाने धिंगाणा घातला आहे.
पुण्यातील आहिल्यानगर रोडच्या वाघोलीजवळ असणाऱ्या सणसवाडी परिसरात होर्डिंग कोसळले आहे.
Rain Update : मान्सून दाखल होण्याआधी राज्यातील काही जिल्ह्यांना आणि शहरांना अवकाळी पावसाने झोडपलं आहे. ग्रामीण पुण्यासह शहरी भागात पावसाने धिंगाणा घातला आहे. 19 मे 2025 रोजी मुसळधार पाऊस झाला होता. काहींच्या घरात पावसाचं पाणी गेलं होतं. अशातच 20 मे 2025 दिवशी मंगळवारी पुण्यातील आहिल्यानगर रोडच्या वाघोलीजवळ असणाऱ्या सणसवाडी परिसरात होर्डिंग कोसळले आहे. त्या होर्डिंगखाली सात दुचाकी अडकल्या आहेत.
हेही वाचा : भाजीविक्रेता ते नेता, जेलवारी ते मंत्रिपद, अनेकदा चढ उतार... छगन भुजबळांचं कमबॅक कसं झालं?
या अपघातामध्ये कोणीही जखमी झालेली नाहीत. अशीच घटना मुंबईमध्ये घाटकोपरमध्ये 6 मे 2024 रोजी घडली. त्या घटनेला एक वर्षे पूर्ण झालं आहे. मुंबईतील होर्डिंग प्रकरणात एकूण 17 जणांचा मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेची पुनरावृत्ती पुण्यात झाली आहे.
होर्डिंग पडल्याचे काही व्हिडिओ आता समोर आला आहे. हे होर्डिंग वर्दळ असणाऱ्या परिसरात पडल्याचे दिसून आले आहे. व्हिडिओ पाहिल्यास लक्षात येतं की, त्यांच्या शेजारी एक मोटारसायकल पडली होती. एक सायकलही पडली होती.










