Indian Air Force मध्ये मोठी भरती, 10वी-12वी पास तरूणांसाठी, संधी.. अर्जाची शेवटची तारीख कोणती?

भारतीय वायुसेनेने 'गट क' मधील सिव्हिलियन पदांसाठी भरती जाहीर केली आहे. लोअर डिव्हिजन क्लर्क, हिंदी टायपिस्ट, कुक, स्टोअर कीपर, सुतार आणि एमटीएस सारख्या बऱ्याच पदांसाठी या भरती घोषित करण्यात आल्या आहेत.

Indian Air Force मध्ये 10 वी आणि 12 वी पास तरुणांसाठी मोठी भरती!

Indian Air Force मध्ये 10 वी आणि 12 वी पास तरुणांसाठी मोठी भरती!

मुंबई तक

• 04:54 PM • 21 May 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

भारतीय हवाई दलात नोकरीची सुवर्णसंधी

point

10 वी आणि 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी मोठी भरती

point

हवाई दलात नोकरी मिळवण्यासाठी काय आहे प्रक्रिया?

Indian Air Force Recruitment 2025: अनेकांचं भारतीय हवाई दलात नोकरी मिळवण्याचं स्वप्न असतं. नुकतंच, भारतीय हवाई दलाने 'गट क' मधील सिव्हिलियन पदांसाठी भरती जाहीर केली आहे. लोअर डिव्हिजन क्लर्क, हिंदी टायपिस्ट, कुक, स्टोअर कीपर, सुतार आणि एमटीएस सारख्या बऱ्याच पदांसाठी या भरती घोषित करण्यात आल्या आहेत. या भरतीमध्ये उमेदवारांना ऑनलाइन नव्हे तर ऑफलाइन अर्ज करावा लागेल. फॉर्म पाठवण्याची शेवटची तारीख 15 जून 2025 असून यानंतर कोणतेही अर्ज स्विकारले जाणार नाहीत. 

हे वाचलं का?

IAF Group C: पदाचे डिटेल्स

भारतीय हवाई दलाने सिव्हिलियन पदांसाठी ही थेट भरती जाहीर केली आहे. कोणत्या पदासाठी किती जागा रिक्त आहेत? हे तुम्ही पाहू शकता. 

याव्यतिरिक्त, तेजपूर आसाम येथील एअर ऑफिसर कमांडिंग एअर फोर्स स्टेशनसाठी लोअर डिव्हिजन क्लर्कच्या 1 पदासाठी, वेस्टर्न एअर कमांड (IAF) मध्ये हिंदी टायपिस्टच्या 1 पदासाठी, एअर फोर्स सेंट्रल अकाउंट्स ऑफिस (AFCAO), IAF मध्ये लोअर डिव्हिजन क्लर्कच्या 3 पदांसाठी रिक्त जागा आहेत.


MTS, LDC Clerk: पात्रता

या आयएएफ सरकारी नोकरीच्या पदांसाठी वेगवेगळ्या पात्रता निश्चित करण्यात आल्या आहेत. एलडीसी क्लर्क पदासाठी बारावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवारांना प्रति मिनिट 30 शब्द हिंदी आणि प्रति मिनिट 35 शब्द इंग्रजी टायपिंग असणं अनिवार्य आहे.

12 वी उत्तीर्ण उमेदवार स्टोअर कीपर पदासाठी अर्ज करू शकतील. तर सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर, कुक पेंटर, सुतार, हाऊसकीपिंग स्टाफ, मेस स्टाफ, एमटीएस पदांसाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

हे ही वाचा: वैष्णवी हगवणेचे 4 व्हॉईस मेसेज, मैत्रिणीला दु:खं सांगितलं, 'त्या' चॅटींगमधून समोर आली खळबळजनक माहिती

वयोमर्यादा

फॉर्म भरण्यासाठी उमेदवारांचे किमान वय 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावे. तसेच, राखीव उमेदवारांना वयोमर्यादेत सूट मिळेल.
या हवाई दलाच्या भरतीमध्ये उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी/प्रॅक्टिकल/शारीरिक चाचणी इत्यादी टप्प्यांतून करण्यात येईल.

हे ही वाचा: महिलेनं तब्बल 25 तरुणांशी केलं लग्न; नंतर पैसे घेऊन व्हायची फरार, बाईईई काय हा प्रकार...

अभ्यासक्रम आणि नियम

लेखी परीक्षेत सामान्य बुद्धिमत्ता, इंग्रजी भाषा, संख्यात्मक अभियोग्यता, सामान्य इंग्रजी आणि सामान्य जागरूकता या विषयांशी संबंधित प्रश्न विचारले जातील. या भरतीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहीर करण्यात आली आहे. फॉर्म भरण्यासाठी, उमेदवारांना ऑफलाइन स्वरूपात अर्ज संबंधित युनिटमध्ये पाठवावा लागेल. 

    follow whatsapp