Pune News: पुणे: पुणे शहरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील वारजेमध्ये 10 वर्षाच्या मुलाला विजेचा धक्का बसला आहे. ज्यात लहान मुलाचा मृत्यू झाला असल्याची दुर्देवी घटना आता समोर आली आहे. वारजे येथील रामनगर भागातील ही घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मुलाचे नाव हे मयंक आडगळे आहे. या घडलेल्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे आडगळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : प्रोटोकॉल, अंडरकव्हर एजंटसारखे शब्द... ज्योती मल्होत्राच्या चॅटमधून मोठा गौप्यस्फोट?
नेमकं घडलं तरी काय?
नुकत्याच आलेल्या माहितीनुसार, मयंक आडगळे हा आपल्या घरासमोर खेळत होता. त्यावेळी त्याचा विजेच्या खांबाला स्पर्श झाला होता. विजेच्या खांबाला विद्युत प्रवाहाचा संपर्क झाल्याने मयंकला जोराचा शॉक बसला. त्यानंतर तो खाली कोसळला होता. त्यानंतर मयंकला नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले होते. मात्र, त्याचा काहीही परिणाम झाला नाही.
दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. दिलेल्या माहितीनुसार, हा विजेचा खांब महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडच्या अखत्यारित येतो. अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच महावितरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला.
या घटनेमुळे रामनगर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. परिसरात असणाऱ्या रहिवाशांनी अनेकदा विजेच्या खांबांबाबत, तसेच उघड्या वायरिंगच्या समस्यांचे निराकरण करण्याची मागणी केली होती. मात्र, यावर स्थानिक प्रशासनाने कोणतेही ठोस काम केलेलं नाही, असा आरोप आता नागरिक करताना दिसत आहेत.
हेही वाचा : महिलेनं तब्बल 25 तरुणांशी केलं लग्न; नंतर पैसे घेऊन व्हायची फरार, बाईईई काय हा प्रकार...
नागरिकांनी केलेल्या या तक्रारीवरुन स्थानिक प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे एका निष्पाप बालकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, महावितरणाच्या निष्काळजीपणावर नागरिक आपली तीव्र नाराजी व्यक्त करू लागले आहेत.
ADVERTISEMENT
