नुसता व्हिडिओ कॉल नाही, आता 3D व्हिडिओ कॉल करा! गूगलचं भन्नाट AI फिचर

AI Google Beem : गुगलने मंगळवारी 22 मे 2025 रोजी रात्री (भारताच्या वेळेनुसार) एका मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. या प्रोजेक्टला गुगल बीम असे नाव देण्यात आले आहे. एआय 3 डी व्हिडिओ कॉलसाठीचे हे एक चांगले प्लॅटफॉर्म तयार होत आहे.

Ai Google Beem Is India's First AI 3D Platform

Ai Google Beem Is India's First AI 3D Platform

मुंबई तक

21 May 2025 (अपडेटेड: 21 May 2025, 10:53 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

गुगलने मंगळवारी 22 मे 2025 रोजी रात्री (भारताच्या वेळेनुसार) एका मोठा कार्यक्रम आयोजित केला होता.

point

या प्रोजेक्टला गुगल बीम असे नाव देण्यात आले आहे.

point

एआय जनरेटेड व्यक्तींमध्ये रियल टाईम वॉईस ट्रान्सलेशनचं फिचर बसवण्यात आले.

AI Google Beem : गुगलने मंगळवारी 22 मे रोजी रात्री (भारताच्या वेळेनुसार) एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजिन केले होते. या कार्यक्रमात कंपनीने अनेक घोषणा केल्या आहेत. ज्यात, कंपनीने त्यांच्या बहुप्रतिक्षित असणाऱ्या स्टारलाईन प्रोजेक्ट संबंधित माहिती दिली. त्या प्रोजेक्टला गुगल बीम असे नाव देण्यात आले आहे. एआय 3D व्हिडिओ कॉलसाठी हे एक चांगले प्लॅटफॉर्म तयार होत आहे. याच गुगल बीमचा फायदा आता लोकांना होणार आहे. 

हेही वाचा : कल्याणमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून 6 जण ठार, ढिगाऱ्याखाली दबलेले अनेकजण गंभीर, कशी घडली घटना?

हे वाचलं का?

गुगल बीमच्या माध्यमातून आपल्याला 3D व्हिडिओ कॉल करता येणार आहे. एआयच्या माध्यमातून समोर बसलेल्या एआय जनरेटेड व्यक्तींमध्ये रियल टाईम वॉईस ट्रान्सलेशनचं फिचर बसवण्यात आले आहे. ज्याचा फायदा हा वापरकर्त्यांना होणार आहे. 

गुगल बीमला याआधी प्रोजेक्ट स्टारलाईन असं म्हटलं जात होतं. गुगल बीमवर गेल्या काही वर्षांपासून काम सुरू होते. गुगल बीम वापरकर्त्यांसाठी लवकरच बाजारात येणार आहे. गुगल बीमच्या अंतर्गत एआय जनरेटेड 3D स्पेशल डिस्प्लेचा वापर करण्यात आला. या सिस्टीमच्या अंतर्गत स्टँडर्ड 2D व्हिडिओच्या प्रणालीत बदल होऊन 3D चा अनुभव घेता येऊ शकतो. व्हिडिओ कॉलसाठी ही प्रणाली अधिकाधिक महत्त्वपूर्ण आहे. 

गुगल बीमला अनेक ठिकाणी पोहोचवण्यासाठी HP कंपनी गुगल बीमसोबत काम करत आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत पहिलं बीम डिव्हाईस लॉन्च केलं जाईल अशी शक्यता आहे. 

हेही वाचा : कोकणात मेघगर्जना, विजांचा कडकडाट अन् सोसाट्याचा वारा..तर मुंबईत पाऊस घालणार धुमाकूळ? जाणून घ्या आजचं हवामान

दरम्यान, पुढील महिन्यात Infocomm कार्यक्रमात बीम गुगल प्रणाली कसं काम करेल हे दाखवले जाणार आहे. गुगल मीट आणि झूमप्रमाणे आता गुगल बीमही एक संयुक्त पद्धतीने काम करणार आहेत. कोणतंही सॉफ्टवेअर न बदलता गुगल बीम व्हिडिओ कॉल्ससाठी फायदेशीर ठरणार आहे. गुगल बीमसाठी ट्रान्सलेशनचे फिचर मिळू शकते. या कंपनीने व्हाईस टोनवरही चांगलं काम केलेलं आहे. 


    follow whatsapp