पश्चिम बंगाल : रस्ते अपघातात १८ जणांचा मृत्यू, ५ जण गंभीर जखमी

मुंबई तक

• 07:21 AM • 28 Nov 2021

रविवारचा दिवस पश्चिम बंगालमध्ये भीषण अपघाताचा दिवस ठरला आहे. मृतदेह नेणाऱ्या गाडीचा ट्रकसोबत झालेल्या अपघातात १८ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. पश्चिम बंगालच्या नादीया जिल्ह्यात हा अपघात घडला आहे. मृतदेह घेऊन जाणारे वाहन स्मशानभूमीकडे जात असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर आदळल्याने हा अपघात झाला. पोलीस आणि स्थानिकांनी घटनास्थळी मदतकार्य करुन परिस्थिती नियंत्रणात आणली […]

Mumbaitak
follow google news

रविवारचा दिवस पश्चिम बंगालमध्ये भीषण अपघाताचा दिवस ठरला आहे. मृतदेह नेणाऱ्या गाडीचा ट्रकसोबत झालेल्या अपघातात १८ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. पश्चिम बंगालच्या नादीया जिल्ह्यात हा अपघात घडला आहे. मृतदेह घेऊन जाणारे वाहन स्मशानभूमीकडे जात असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर आदळल्याने हा अपघात झाला.

हे वाचलं का?

पोलीस आणि स्थानिकांनी घटनास्थळी मदतकार्य करुन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा येथील बगदा भागातून काही जण मृतदेह घेऊन नवद्वीप स्मशानभूमीकडे जात होते. यावेळी वाहनात 20 हून अधिक प्रवासी असल्याचं कळतंय. मृतदेह नेणारी गाडी हंसखळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुलबारी येथे आली असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, एक ट्रक रस्त्याच्या कडेला उभा होता.

मृतदेह घेऊन जाणारं वाहनंही त्यादरम्यान भरधाव वेगाने जात होतं. दाट धुक्यामुळे चालकाला ट्रक दिसला नसावा आणि तो वेगात जाऊन ट्रकला धडकला असावा.

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; 5 जागीच ठार, 6 जण गंभीर

या अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की यानंतर परिसरात मोठा आवाज झाला. स्थानिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचताच मृतदेह बाहेर काढून पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. अपघातातील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असून काहींची प्रकृती गंभीर असल्याचं कळतंय.

    follow whatsapp