महाराष्ट्रात दाखल झालेल्या मान्सूनने गेल्या काही दिवसांमध्ये बहुतांश भागांत जोरदार हजेरी लावली आहे. १५ जून पर्यंतचा काळ मुंबईसह महाराष्ट्रातील महत्वाच्या जिल्ह्यांसाठी महत्वाचा असणार आहे. या काळात मुसळधरा पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुसळधार पावसात नदीला आलेल्या पुरात दुचाकी गाडी घालणं औरंगाबादमधील दोन तरुणांना चांगलंच महागात पडलं आहे.
ADVERTISEMENT
फुलंब्री तालुक्यातील फुलमस्ता नदीला पावसामुळे पूर आला आहे. पानवडोद गावातील दोन तरुण यावेळी नदीच्या पुलावरुन पुराच्या पाण्यात आपल्या दुचाकीवरुन येण्याचं धाडस करत होते. परंतू पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज आला नाही आणि हे दोन्ही तरुण नदीत ओढले गेले. यावेळी काही लोकं इथे उपस्थित होती…मोबाईल कॅमेऱ्यामध्ये हा प्रकार कैद झालाय. परंतू गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे या दोन्ही तरुणांचा जीव वाचण्यात यश आलंय. पुराच्या पाण्यात गाडी घालणं किती धोकादायक असतं हे या प्रसंगावरुन पुन्हा एकदा स्पष्ट झालंय.
ADVERTISEMENT
