मुंबईत कोरोनाच्या Delta Plus Variant चे आणखी 2 रूग्ण, महाराष्ट्रात आता 23 रूग्ण

मुंबईत कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे आणखी दोन रूग्ण आढळले आहेत. या दोन रूग्णांमुळे मुंबईतील डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या रूग्णांची संख्या 3 झाली आहे. तर राज्यातली संख्या ही 23 झाली आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने Variant Of Concern असं आधीच जाहीर केलं आहे. दरम्यान मुंबईत जे नवे दोन रूग्ण आढळले आहेत ते आता कोरोनातून बरे […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 05:25 PM • 28 Jul 2021

follow google news

मुंबईत कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे आणखी दोन रूग्ण आढळले आहेत. या दोन रूग्णांमुळे मुंबईतील डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या रूग्णांची संख्या 3 झाली आहे. तर राज्यातली संख्या ही 23 झाली आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने Variant Of Concern असं आधीच जाहीर केलं आहे. दरम्यान मुंबईत जे नवे दोन रूग्ण आढळले आहेत ते आता कोरोनातून बरे झाले आहेत अशीही माहिती देण्यात आली आहे.

हे वाचलं का?

महाराष्ट्रात आत्तापर्यंत डेल्टा प्लस व्हेरिएंटचे २१ रूग्ण होते त्यातल्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे. आता मुंबईत दोन आणखी रूग्ण आढळले आहेत ते बरे झाले आहेत मात्र आता महाराष्ट्रातल्या कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या रूग्णांची संख्या 23 झाली आहे

Variant Of Concern म्हणजे नेमकं काय?

जेव्हा कोणताही व्हायरस हा जास्त प्रमाणात रोग प्रसार वाढवणारा असतो किंवा जास्त प्रमाणात साथ रोगामुळे मृत्यू वाढवणारा असतो तेव्हा त्याला Variant Of Concern असं जाहीर केलं जातं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात आणि महाराष्ट्रात हाहाकार माजवला. कोरोनाची दुसरी लाट देशातून आणि राज्यातून ओसरत असतानाच आता समोर धोका आहे तो डेल्टा प्लसचा. त्याला व्हेरिएंट ऑफ कन्सर्न असं जाहीर करण्यात आलं आहे. म्हणजेच काळजी वाढवणारा व्हेरिएंट किंवा व्हायरसचा प्रकार असं त्याला जाहीर करण्यात आलं आहे. कोरोनाचा विषाणू रूप बदलू लागला आहे. जगभरात कोरोनाच्या व्हायरसचे वेगवेगळे व्हेरिएंट आहेत. त्या व्हेरिएंटना WHO ने नावंही दिली आहेत. अशावेळी आता डेल्टा प्लस हा व्हेरिएंट काळजी वाढवणारा व्हेरिएंट म्हणून जाहीर झाला आहे.

डेल्टा प्लस व्हेरिएंट नेमका काय आहे?

कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमध्ये आणखी बदल होऊन म्हणजेच म्युटेशन होऊन डेल्टा प्लस हा व्हेरिएंट तयार झाला आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटमध्ये डेल्टा व्हेरिएंटमधे असलेले सगळे म्युटेशन आहेत. तसंच या व्हेरिएंटमध्ये K417N हे म्युटेशनही आढळलं आहे. भारतात सगळ्यात आधी आढळलेल्या डेल्टा व्हेरिएंटचं शास्त्रीय नाव B.1.617.2 असं आहे. तर आता म्युटेट झालेल्या म्हणजेच बदल झालेल्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचं नाव हे B.1.617.2.1 असं आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटबाबत नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी दिलेली माहिती अशी ‘कोरोना संसर्गाची दसरी लाट अधिक झपाट्याने पसरण्यासाठी डेल्टा व्हेरिएंट कारणीभूत होता. यात आणखी एक म्युटेशन झालं आहे. याला डेल्टा प्लस असं नाव देण्यात आलं आहे.’

कोणत्या व्हेरिएंटला काय नाव देण्यात आलं आहे?

WHO ने दिलेल्या माहितीनुसार ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या बी 1.1.7 या व्हेरिएंटला अल्फा हे नाव देण्यात आलं आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळून आलेल्या बी. 1.351 ला बीटा असं नाव देण्यात आलं आहे. ब्राझिलमध्ये नोव्हेंबर 2020 ला आढळून आलेल्या पी.1 स्ट्रेनला गामा हे नाव देण्यात आलं आहे. अमेरिकेत आढळून आलेल्या B. 1.427 आणि B 1.429 हा व्हेरिएंट आता एप्सीलोन नावाने ओळखला जाईल. B.1.526 या व्हेरिएंटला आयोटा हे नाव देण्यात आलं आहे. फिलीपीन्समध्ये कोरोना व्हायरसचा स्ट्रेन P.3 आढळून आला होता त्याला थीटा असं नाव देण्यात आलं आहे. काही देशात आढळून आलेल्या B.1.525 या व्हेरिएंटला ईटा हे नाव देण्यात आलं आहे.