वाशिम : विहीरीचा भाग खचून २ मजुरांचा मृत्यू, १ जखमी

वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकलासपूर गावात एका शेतकऱ्याच्या शेतात विहीर खणण्याचं काम सुरु असताना काही भाग खचून त्याखाली ३ मजूर अडकले. या घटनेची माहिती मिळताच, स्थानिक ग्रामस्थांनी जेसीबीच्या सहाय्याने हा खचलेला भाग बाजूला काढण्यात यश मिळवलं. परंतू या अपघातात दोन मजूरांचा मृत्यू झाला असून एक मजूर गंभीर जखमी झाला […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 07:06 AM • 23 Mar 2022

follow google news

वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकलासपूर गावात एका शेतकऱ्याच्या शेतात विहीर खणण्याचं काम सुरु असताना काही भाग खचून त्याखाली ३ मजूर अडकले.

हे वाचलं का?

या घटनेची माहिती मिळताच, स्थानिक ग्रामस्थांनी जेसीबीच्या सहाय्याने हा खचलेला भाग बाजूला काढण्यात यश मिळवलं. परंतू या अपघातात दोन मजूरांचा मृत्यू झाला असून एक मजूर गंभीर जखमी झाला आहे. जखमी मजुरावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एकलासपूर येथील गजानन मुळे यांच्या शेतात विहीर खणण्याचं काम सुरु होतं. मंगळवारी दुपारी चार वाजल्याच्या दरम्यान, या विहीरीचा काही भाग खचल्यामुळे तीन मजूर यात अडकले. ज्यात गजानन लाटे आणि प्रभू गळी या दोन मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. शेख अख्तर हा मजूर यात जखमी झाला. पोलिसांनी घडलेल्या घटनेची दखल घेत, घटनास्थळी जात पंचनामा करुन पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

    follow whatsapp