Omicron : परदेशातून २९५ नागरिक कल्याण-डोंबिवलीत, KDMC १०९ जणांच्या शोधात

मुंबई तक

• 03:17 AM • 07 Dec 2021

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिका आणि अन्य देशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी सरकारने निर्बंध कडक केले असून भारतात दाखल झाल्यानंतर सर्वांना RTPCR चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. परंतू कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या चिंतेत भर टाकणारी एक बातमी समोर आली आहे. २९५ नागरिक परदेशातून शहरात आले असून यापैकी १०९ जणांचा अद्याप संपर्क झालेला नसल्याचं KDMC आयुक्त डॉ. विजय […]

Mumbaitak
follow google news

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिका आणि अन्य देशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी सरकारने निर्बंध कडक केले असून भारतात दाखल झाल्यानंतर सर्वांना RTPCR चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. परंतू कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या चिंतेत भर टाकणारी एक बातमी समोर आली आहे. २९५ नागरिक परदेशातून शहरात आले असून यापैकी १०९ जणांचा अद्याप संपर्क झालेला नसल्याचं KDMC आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी सांगितलं.

हे वाचलं का?

परदेशातून कल्याण डोंबिवलीत आलेल्या २९५ नागरिकांपैकी ८८ जणांची कोवीड चाचणी करण्यात आली. त्यापैकी ३४ लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून उर्वरित ४८ जणांचे रिपोर्ट आद्यप येणे बाकी आहेत. यातील ३४ लोकं ही केडीएमसी च्या बाहेरचे रहिवासी असून उर्वरित १०९ जणांशी संपर्क साधण्यासाठी केडीएमसी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. परंतू अनेकांचे फोन बंद येत असून काहींच्या घराला कुलूप लावलेलं असल्यामुळे संपर्कात अडथळा येत असल्याचं आयुक्तांनी सांगितलं.

पिंपरी-चिंचवड : धाकधुक वाढली, परदेशातून आलेल्या १० प्रवाशांना कोरोनाची लागण

परदेशातून कल्याण-डोंबिवलीमध्ये येणाऱ्या व्यक्तींसाठी SOP तयार करण्यात आली आहे. At Risk (कमी धोक्याचे देश) आणि High Risk (अति धोक्याचे देश) देशांतून येणाऱ्या व्यक्तींना ७ दिवसाचे होम कॉरंटाईन बंधनकारक करण्यात आले आहे. या ७ दिवसांत नियंत्रण ठेवण्यासाठी कॉल सेंटरमधून फोनद्वारे संपर्क साधण्यासह केडीएमसीचे मेडिकल ऑफिसरही त्याठिकाणी सरप्राईज व्हिजीट करणार असल्याचे डॉ.सूर्यवंशी म्हणाले. तसेच ८ व्या दिवशी बाहेरुन आलेल्या प्रवाशांची कोवीड टेस्ट होणार असून त्यात निगेटिव्ह आले तरीही परत ७ दिवसांचे होम कॉरंटाईन आणि पॉझिटिव्ह आल्यास महापालिकेतर्फे संस्थात्मक कॉरंटाईन केले जाणार आहे.

याचसोबत ज्या सोसायटीमध्ये अशा व्यक्ती राहत असतील त्या नियमानुसार होम कॉरंटाईन करतात की नाही याची खबरदारी सोसायटीने घेण्याचे निर्देश देत उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर साथरोग नियंत्रण कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाईचा इशाराही डॉ. सूर्यवंशी यांनी दिला आहे.

६ जण कोरोना पॉझिटिव्ह –

नायजेरिया येथून आलेल्या एका कुटुंबातील ४ जण पॉझिटिव्ह आढळून आले असून यात १० व ६ वर्षीय बालकांचा समावेश आहे. तसेच रशिया व नेपाळ येथून आलेल्या प्रत्येकी १ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यांचे सॅम्पल हे जिनोम सिक्वेन्सिंग साठी पाठविण्यात आल्याचे पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

Corona RTPCR चाचणी 350 रूपयांमध्ये होणार, राज्य सरकारने पुन्हा एकदा घेतला दर कमी करण्याचा निर्णय

मास्क न घालणाऱ्यांविरोधात उद्यापासून पुन्हा कडक कारवाई –

गेल्या काही दिवसांपासून मास्क न घालता वावरणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. अशा व्यक्तींविरोधात आजपासून पोलीस आणि महापालिकेची संयुक्त कारवाई पुन्हा सुरू होणार असल्याची माहितीही डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. याशिवाय लग्न समारंभ , मोठे कार्यक्रमांमध्ये शासनाने दिलेल्या नियमांचे पालन होतेय की नाही यावरही करडी नजर असेल असे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.

Omicron : आता मुंबईत आढळले ओमिक्रॉनचे दोन रूग्ण, महाराष्ट्रातली रूग्णसंख्या 10

कोरोनाला अटकाव घालण्यात कोवीड लस ही महत्वाचा घटक असून ज्या लोकांनी अद्याप लस घेतलेली नसेल त्यांनी तातडीने लस घेण्याचे आवाहनही केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केलं आहे.

    follow whatsapp