गुड न्यूज: 1 मार्चपासून ‘यांना’ दिली जाणार कोरोनावरील मोफत लस

मुंबई तक

• 10:45 AM • 24 Feb 2021

नवी दिल्ली: कोरोना लसीकरणाबाबत भारत सरकारने आज (24 फेब्रुवारी) एक मोठी घोषणा केली आहे. देशात 1 मार्च 2021 पासून 60 वर्षांवरील लोकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी कॅबिनेटमध्ये झालेल्या निर्णयाची माहिती देताना याबाबतची घोषणा केली. प्रकाश जावडेकर यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, ‘1 मार्चपासून 45 वर्षापेक्षा अधिक वय […]

Mumbaitak
follow google news

नवी दिल्ली: कोरोना लसीकरणाबाबत भारत सरकारने आज (24 फेब्रुवारी) एक मोठी घोषणा केली आहे. देशात 1 मार्च 2021 पासून 60 वर्षांवरील लोकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी कॅबिनेटमध्ये झालेल्या निर्णयाची माहिती देताना याबाबतची घोषणा केली.

हे वाचलं का?

प्रकाश जावडेकर यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, ‘1 मार्चपासून 45 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या लोकांन लस दिली जाणार आहे ज्यांना गंभीर आजार आहेत. देशातील ज्या 10 हजार सरकारी केंद्रांवर लोक लस घेण्यासाठी जातील त्यांना मोफत ही लस दिली जाणार आहे.’ यावेळी प्रकाश जावडेकर यांनी असंही सांगितलं की, जे लोकं खासगी रुग्णालयात लस घेतील त्यांना मात्र पैसे मोजावे लागणार आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून लवकरच लसीचे दर जाहीर केले जातील.

आतापर्यंत 1 कोटींहून अधिक लोकांना देण्यात आलीए लस

आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी अशी माहिती दिली की, 16 जानेवारीपासून 24 फेब्रुवारीपर्यंत जवळजवळ 1.7 कोटी लोकांना कोरोनावरील लस देण्यात आली आहे. तर 14 लाख जणांना कोरोनावरील दुसरी लस देखील देण्यात आली आहे. दरम्यान यावेळी रविशंकर प्रसाद असंही म्हणाले की, केंद्र सरकारमधील सर्व मंत्री हे पैसे देऊन कोरोनाची लस घेणार आहेत. म्हणजेच 60 वर्षांवरील वयाचे मंत्री देखील मोफत लस घेणार नाही.

कोरोना लसीसंबंधी ही बातमी पण पाहा: …तर साठ दिवसात ५० कोटी लोकांना लस देता येईल-अझीम प्रेमजी

भारतात जानेवारी महिन्यात कोरोना लसीची पहिली फेज सुरु झाली होती. सुरुवातीच्या फेजमध्ये सर्वप्रथम कोरोना वॉरियर्सला लस देण्यात येत आहे. ज्यामध्ये आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी आणि इतर काही जणांना लस देण्यात आली.

आता दुसऱ्या फेजमध्ये 60 वर्षांहून अधिक वय असणाऱ्यांना आणि 45 वर्षाहून अधिक वय असणाऱ्यांना (ज्यांना गंभीर आजार आहे) देखील लस मिळणार आहेत. यानंतरच्या फेजमध्ये इतर लोकांचा नंबर लागणार आहे. दुसरीकडे कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा अशावेळी सुरु आहेत जेव्हा महाराष्ट्र, केरळ यासारख्या राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आता या दुसऱ्या फेजमधील लसीकरणाचा कार्यक्रम कशा प्रकारे राबविला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp