मुंबई-पुणे महामार्गावर प्रवासी बसचा अपघात, तीन कामगारांचा मृत्यू

मुंबई तक

• 03:51 AM • 12 Dec 2021

मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाट उतरत असताना प्रवासी बसला झालेल्या अपघातात तीन कामगारांना आपला प्राण गमवावा लागला आहे. शनिवारी मध्यरात्री खोपोलीजवळ हा अपघात घडला आहे. या अपघातात महामार्गावर काम करणाऱ्या दोन कामगारांचा जागीच तर एका कामगाराला उपचारासाठी नेताना आपले प्राण गमवावे लागले. मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गाच्या मध्यभागी काँक्रिटीकरणाचं काम सुरु होतं. यावेळी एका प्रवासी बसने त्या ठिकाणच्या सिमेंट […]

Mumbaitak
follow google news

मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाट उतरत असताना प्रवासी बसला झालेल्या अपघातात तीन कामगारांना आपला प्राण गमवावा लागला आहे. शनिवारी मध्यरात्री खोपोलीजवळ हा अपघात घडला आहे. या अपघातात महामार्गावर काम करणाऱ्या दोन कामगारांचा जागीच तर एका कामगाराला उपचारासाठी नेताना आपले प्राण गमवावे लागले.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गाच्या मध्यभागी काँक्रिटीकरणाचं काम सुरु होतं. यावेळी एका प्रवासी बसने त्या ठिकाणच्या सिमेंट ब्लॉकला धडक मारली. या अपघातात चार वाहनं एकमेकांवर आदळली आहेत. बसमधील सर्व प्रवासी सुखरुप असून काहींना किरकोळ जखमा झाल्या आहेत.

बसमधील प्रवाशांना उपचार दिल्यानंतर मुंबईकडे रवाना करण्यात आलं आहे. तसेच या अपघातात जखमी झालेल्या दोन कामगारांना कामोठे येथील MIG रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. IRB पेट्रोलिंग, देवूत यंत्रणा, बोरघाट पोलीस, खोपोली पोलीस आणि अन्य यंत्रणाच्या मदतीने या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आलं.

दरम्यान याच भागात पहाटे पाच वाजल्याच्या दरम्यानही आणखी एक अपघात घडला. खोपोलीजवळ पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका चारचाकी वाहनाला आग लागली. पहाटे पाच वाजता लागलेल्या या आगीत ही कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

    follow whatsapp