बायको दोन महिन्यांची गर्भवती, सोबत शेवया खाल्ल्या अन् रात्री हत्या; नवऱ्याने का उचललं टोकाचं पाऊल?

Crime News : हरियाणातील हिसार येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील हंसी परिसरातील सेठी चौकात राहणाऱ्या कृष्ण कथुरिया यांच्या घरात 24 तासांपूर्वी मुलीच्या येण्याने आनंदाचे वातावरण होते. मुलगी महक हिला शेवया आवडत असल्याने आईने तिला पोटभर भरवले आणि जाताना सोबतही दिल्या. मात्र, ही भेट शेवटची ठरेल असे कोणालाही वाटले नव्हते. सोमवारी (16 फेब्रुवारी) संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास जेव्हा महकचा मृतदेह तिच्या माहेरी पोहोचला, तेव्हा केवळ कुटुंबीयांचेच नव्हे तर उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 06:45 PM • 17 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

बायको दोन महिन्यांची गर्भवती, सोबत शेवया खाल्ल्या अन् रात्री हत्या

point

नवऱ्याने का उचललं टोकाचं पाऊल?

Crime News : हरियाणातील हिसार येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील हंसी परिसरातील सेठी चौकात राहणाऱ्या कृष्ण कथुरिया यांच्या घरात 24 तासांपूर्वी मुलीच्या येण्याने आनंदाचे वातावरण होते. मुलगी महक हिला शेवया आवडत असल्याने आईने तिला पोटभर भरवले आणि जाताना सोबतही दिल्या. मात्र, ही भेट शेवटची ठरेल असे कोणालाही वाटले नव्हते. सोमवारी (16 फेब्रुवारी) संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास जेव्हा महकचा मृतदेह तिच्या माहेरी पोहोचला, तेव्हा केवळ कुटुंबीयांचेच नव्हे तर उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले. ज्या पतीने जन्मभर सोबत देण्याचे वचन दिले होते, त्यानेच आपल्या मुलीचा जीव कसा घेतला, या प्रश्नाने सर्वजण सुन्न झाले आहेत.

हे वाचलं का?

हे ही वाचा : अहिल्यानगर : पोटच्या मुलानेच आईला संपवलं, चाकू आणि अडकित्त्याच्या सहाय्याने हत्या, दोन तास मृतदेहाजवळच खेळत बसला

5 महिन्यांपूर्वी लग्न

महकचं लग्न 25 सप्टेंबर 2025 रोजी हिसार येथील सेक्टर 33 मध्ये राहणाऱ्या अंशुल धवन याच्याशी झाला होता. अंशुलचे कुटुंबही मूळचे हंसी येथीलच रहिवासी आहे. कुटुंबीयांच्या सांगण्यानुसार, लग्नानंतर दोघेही सुखी होते आणि त्यांच्यात कधीही वाद झाल्याचे समोर आले नव्हते. गेल्या महिन्यातच अंशुलने नवीन कारही खरेदी केली होती. रविवारी महक आणि अंशुल हिसारहून गुरुग्रामला जात असताना हंसी येथे माहेरी थांबले होते. मात्र, रात्री अचानक अंशुलच्या वडिलांचा फोन आला आणि त्यांनी महकची हत्या झाल्याचे सांगितले. यामुळे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला.

दोन महिन्यांची गर्भवती

महक गेल्या साडेपाच वर्षांपासून एचडीएफसी बँकेत डेप्युटी मॅनेजर म्हणून कार्यरत होती. तिने नरवाना येथेही सेवा बजावली होती आणि सध्या तिची बदली गुरुग्राममध्ये झाली होती. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, महक दोन महिन्यांची गर्भवती होती. शेजाऱ्यांच्या मते महक अत्यंत शांत स्वभावाची होती. तिचे वडील कृष्ण कथुरिया भाजी मंडईत दुकान चालवतात, तर भाऊ अक्षय मेडिकल रिप्रजेंटेटिव्ह म्हणून काम करतो. एका उच्चशिक्षित आणि सुसंस्कृत कुटुंबातील या मुलीचा असा अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हे ही वाचा : 

हत्येचं नेमकं कारण काय?

सोमवारी सायंकाळी उशिरा महकवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या पश्चात आई-वडील, मोठी बहीण श्रुती आणि भाऊ अक्षय असा परिवार आहे. पतीने इतके टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. ज्या घरातून काही तासांपूर्वी हसत-खेळत निरोप घेतला होता, त्याच घरातून महकची अंत्ययात्रा निघालेली पाहून उपस्थित जनसमुदाय हेलावून गेला होता.
 

    follow whatsapp