गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या अमरावती शहरावरच संकट काहीकेल्या कमी होताना दिसत नाहीये. अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठातही कोरोनाने शिरकाव केला आहे. नुकतीच विद्यापीठात काम करणाऱ्या ३०० कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणी घेण्यात आली. ज्यात ५६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे.
ADVERTISEMENT
५६ कर्मचाऱ्यांपैकी १३ जणं हे एकाच कुटुंबातील असल्यामुळे विद्यापीठ प्रशासनासमोरच्या चिंता वाढल्या आहेत. अमरावती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. हेमंत देशमुख यांनी ही माहिती दिली. संत गाडगेबाबा विद्यापीठातून अमरावतीसह अकोला, बुलडाणा, वाशिम आणि यवतमाळ अशा ५ जिल्ह्यांचा शैक्षणिक कारभार चालतो. अशा परिस्थितीत विद्यापीठातील ५६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे आगामी काळात परीक्षा आणि निकालांवर परीणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ADVERTISEMENT











