धक्कादायक ! अमरावतीमधील ६० टक्के परिसर कोरोनाबाधित

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होत असलेली चिंताजनक वाढ पाहता राज्य सरकारने सावधगिरीची पावलं उचलायला सुरुवात केली आहे. विदर्भातील अमरावती शहरात रुग्णसंख्येत धक्कादायक वाढ होत असून शहराचा ६० टक्के भाग हा कोरोनाबाधित असल्याची धक्कादायक माहिती महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी मुंबई तक शी बोलताना दिली. अमरावती शहरात ३६ तासांचं विशेष लॉकडाउन जाहीर करण्यात […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 07:54 AM • 21 Feb 2021

follow google news

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होत असलेली चिंताजनक वाढ पाहता राज्य सरकारने सावधगिरीची पावलं उचलायला सुरुवात केली आहे. विदर्भातील अमरावती शहरात रुग्णसंख्येत धक्कादायक वाढ होत असून शहराचा ६० टक्के भाग हा कोरोनाबाधित असल्याची धक्कादायक माहिती महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी मुंबई तक शी बोलताना दिली.

हे वाचलं का?

अमरावती शहरात ३६ तासांचं विशेष लॉकडाउन जाहीर करण्यात आलं असून जिवनावश्यक वस्तूंचा अपवाद वगळता सर्व गोष्टी बंद ठेवण्यात आल्या आहेत. गेल्या दहा दिवसांपासून अमरावती जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असून शनिवारी अमरावतीमध्ये नव्याने 727 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे. गेल्या वर्षापासून जिल्ह्यातला हा सर्वाधिक आकडा असल्यामुळे जिल्हा प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. शनिवारी अमरावतीत सात जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत…त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कन्टेन्मेंट झोनवर विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली आहे.

शहरातील सर्व बाजारपेठा बंद असून रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळत आहे. अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व दुकानं लॉकडाउन काळात बंद करण्यात आल्या असून पोलीसांचा कडक बंदोबस्त लागू करण्यात आला आहे. अमरावतीमधील रुग्णसंख्येत होत असलेली वाढ ही चिंताजनक असून भविष्यकाळात यावर नियंत्रण मिळवता आलं नाही तर प्रशासन पुन्हा एकदा लॉकडाउन जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अवश्य वाचा – राज्यात पुन्हा लॉकडाउनचे संकेत? मुख्यमंत्री आज जनतेशी संवाद साधणार

    follow whatsapp